कोकणातील कुठल्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची दिवसात उच्चांकी वाढ़ आणि चौघांचे मृत्यू

0
0

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी उच्चांकी 190 रुग्ण वाढले आहेत. एकाच दिवसात द्विशतकाजवळ झालेल्या वाढीमुळे रुग्ण संख्या पावणे तीन हजारांच्या घरात पोहोचली आहे. आणखी चार व्यक्तींचे निधन झाल्याने कोरोनाबळी संख्यने अर्धशतक गाठले आहे. दिवसभरात 40 जणांना डिस्चार्ज मिळाला. त्याने कोरोनामुक्तांची संख्या दीड हजारांवर गेली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या पुन्हा हजारावर गेली असून ती एक हजार 531 झाली आहे. 

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असून मृत्यु संख्याही वाढती राहिली आहे. मंगळवार (ता.15) दुपारनंतर बुधवार दुपारपर्यंत आणखी 516 अहवाल प्राप्त झाले आहेत. यातील 326 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तब्बल 190 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्ण वाढ आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. यामुळे जिल्ह्यात सोशल स्प्रेड झाल्याचे बोलले जात आहे. परिणामी जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊनची मागणी जोर धरु लागली आहे. कडक निर्बंध कोरोनाची वाढती साखळी तोड़ू शकते, अशा प्रतिक्रिया सुरु झाल्या आहेत. 

जिल्ह्यात काल (ता.15) दोन हजार 520 एकूण बाधित रुग्ण होते. त्यात 190 रुग्ण वाढल्याने ही संख्या दोन हजार 710 झाली आहे. दरम्यान, जिल्हा कोरोना चाचणी केंद्राकडे नव्याने 447 नमूने मिळाले. एकूण नमुन्याची संख्या 21 हजार 139 झाली. यातील 20 हजार 570 अहवाल मिळाले. 569 प्रलंबित आहेत. 50 व्यक्तीचे निधन झाले आहे. एक हजार 531 कोरोनामुक्त आहे. जिल्ह्यात सक्रिय रुग्ण एक हजार 129 असून या सर्वांवर रुग्णावर जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पिटल किंवा होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहेत. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात संस्थात्मक क्‍वारंटाईनमध्ये 164 व्यक्ती वाढल्या. तेथील संख्या 21 हजार 71 झाली आहे. यातील गाव पातळीवरील गृह व संस्थात्मकमध्ये 136 व्यक्ती वाढल्या. तेथील संख्या आठ हजार 421 झाली आहे. नागरी क्षेत्रातील 28 व्यक्ती वाढल्याने येथील संख्या 12 हजार 590 झाली आहे. 


राज्य कृषी विभागातील कर्मचाऱ्याचे निधन 
जिल्ह्यातील कोरोना बळी संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.  राज्य शासनाच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे मंगळवारी कोरोनाने निधन झाले आहे. ते 10 दिवसांपूर्वी कोरोनाबाधित आले होते. यामुळे कृषी विभागात खळबळ माजली आहे. 

           कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर 

  • जिल्हाधिकारी अधिक सक्रिय 
  • जिल्ह्यातील दोन खासगी रुग्णालये केली अधिग्रहित 
  • कणकवलीतील संजीवन हॉस्पिटल तर मालवनातील रेडकर हॉस्पिटलचा समावेश 
  • एकूण 24 खाटा केल्या अधिग्रहित 
  • शासनाच्या निर्देशानुसार उपचार दर निश्‍चित 
  • जिल्हा रुग्णालयात चांगल्या सुविधा देण्याचे सीएसला आदेश 
  • आंघोळीचे पाणी गरम, पिण्याचे पाणी स्वच्छ देण्याचे आदेश 
  • स्वच्छतागृहे व खिडक्‍या तत्काळ दुरुस्त करण्याचे बांधकामला आदेश 
  • कोरोना माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड कक्ष स्थापन 
  • माहितीसाठी 1077 क्रमांकावर संपर्काचे आवाहन 

संपादन : विजय वेदपाठक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com