तिवरे धरणफुटीमागचा खेकडा कोण ?

Who Is Responsible To Tiware Dam Co laps Incidence
Who Is Responsible To Tiware Dam Co laps Incidence

चिपळूण ( रत्नागिरी ) - दसपटी विभागात तालुक्‍याच्या टोकास वसलेल्या तिवरे धरणफुटीत 23 जणांचा बळी गेला होता. धरणाच्या पायथ्याशी वसलेली भेंदवाडीतील घरे उद्‌ध्वस्त झाली होती. दुर्घटनेच्या तपासासाठी शासनाने एसआयटीची स्थापना केली होती. या समितीचा अहवाल आठवड्यात शासनाला दिला जाणार आहे. त्यामुळे दुर्घटनेत नेमका कोणावर ठपका ठेवण्यात आला की, सर्वांना क्‍लीन चिट दिली याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागलेले आहे. खेकड्यामुळे धरण फुटले हा विषयही यावेळी चर्चेत आला होता. फुटीमागचा खेकडा कोण? याचीच उत्सुकता आता लागली आहे.

2 जुलैच्या रात्री तिवरे धरण फुटल्यानंतर भेंदवाडीतील 23 जणांचा हकनाक बळी गेला होता. तिवरे नदीकाठच्या गावांनाही धरणफुटीचा तडाखा बसला होता. तिवरेसह व नदीकाठच्या परिस्थितीत पूर्वपदावर येण्यासाठी शासकीय यंत्रणा आणि समाजातील विविध संस्था कामास जुंपल्या होती. तिवरेवासीयांवर मोठी आपत्ती कोसळल्याने समाजातील विविध घटकांतून मदतीचा ओघ सुरू होता. तिवरे धरणाची बांधणी 20 वर्षापूर्वी झाली होती. अवघ्या 20 वर्षात मातीचे धरण फुटल्याने टीकेचा भडीमार सुरू होता. दरम्यान गेल्या दोन वर्षापासून तिवरे धरणास गळती लागली होती. मे 2019 मध्ये "सकाळ"ने धरणातील गळतीचा मुद्दा लावून धरला होता. मे महिन्याच्या अखेरीस मातीचा भराव टाकून तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली. परिणामी पावसाळ्यात 2 जुलैला धरण फुटले आणि 23 जणांचा बळी गेला.

ठेकेदार, जलसंपदा अधिकारी यांवर दोषारोप राहणार का?

दुर्घटनेसाठी नियुक्त केलेल्या विशेष चौकशी समितीने धरण व परिसराची पाहणी केली होती. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाल्याने समितीच्या संयुक्त बैठका झाल्या नसल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जाहीर केले होते. दरम्यान चौकशी अहवाल अंतिम टप्प्यात असून तो आठवड्यात राज्य सरकारला सादर होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तिवरे धरणफुटीत खेकड्यांना गोवण्यात आल्याने तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांवर टीकेचा भडीमार झाला होता. त्यामुळे दुर्घटनेस नेमका कोणावर ठपका ठेवणार? ठेकेदार, जलसंपदाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांवर दोषारोप राहणार का? याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com