सिंधुदुर्गच्या महाविकासाची कुणी दिली ग्वाही

who testified about the great development of sindhudurg district
who testified about the great development of sindhudurg district

कुडाळ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून कोकणात पंचतारांकित हॉटेल्स, बारमाही पर्यटनासह कोकणच्या महाविकासाचे नवीन पर्व खुले करणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर कोरोना टेस्ट लॅब येत्या पंधरा दिवसांत ओरोस जिल्हा रुग्णालयात साकारणार आहे, अशी माहिती लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते खासदार विनायक राऊत यांनी गुरूवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. 

ते म्हणाले, ""कोरोना संकट काळात आता रत्नागिरी येथे कोरोना टेस्ट मशीन कार्यान्वित झाले. येत्या पंधरा दिवसांत ओरोस येथे मशीन कार्यान्वित झाल्यानंतर अवघ्या तासात 96 अहवाल मिळणार आहेत. स्वॅब मशीनचा पहिला टप्पा ट्रूनॅट असून, त्याचे दोन दिवसांपूर्वीच उद्‌घाटन झाले. कोकणच्या विकासाचे नवे पर्व साकारताना सावंतवाडी येथे 100 कोटींचे अद्ययावत हॉस्पिटल, कुडाळचे महिला हॉस्पिटल लवकरच पूर्णत्वास येणार आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने कोकणवासीयांना दिलेला कायापालट करण्याचा शब्द प्रत्यक्षात साकारत आहे.'' 

ते म्हणाले, ""येथील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यात येणार आहे. सध्या आरोग्य, बांधकाम व इतर सर्वच क्षेत्रांत 60 टक्के पदे रिक्त आहेत. ही पदे चक्राकर पद्धतीने भरण्याची कार्यवाही शासन करणार आहे. ताज, फोमेंतोसारखी पंचतारांकित हॉटेल सिंधुदुर्गच्या विकासाचे पर्व घेऊन येणार आहे. हे सर्व प्रकल्प राबविताना स्थानिकांना विश्‍वासात घेऊनच केले जाणार आहे. कोणावरही अन्याय होणार नाही, जबरदस्तीने प्रकल्प लादले जाणार नाहीत. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्हा फक्त सागरी पर्यटनाचा नको तर बारमाही पर्यटन व्हावा, यासाठी केलेल्या मागणीला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. केंद्राच्या पर्यटनमंत्र्यांनीही यासाठी सहकार्य केले आहे.'' 

ते म्हणाले, ""किनारपट्टी नैसर्गिक आपत्ती, फयान चक्रीवादळ यातून सुरक्षितेतच्या दृष्टीने राज्य सरकार कटिबद्ध आहे. या सर्व बाबतीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यास 2015 मध्ये जे दर होते त्यात बदल करून सुधारित दरानुसार दुप्पट मदत मिळण्याची तरतूद केली आहे. भातपीक एकरी आठ हजारवरून 20 हजार रुपये केले आहे. कोविड संकटामुळे शेतकऱ्यांसाठी बॅंक कर्जमाफ, खावटी कर्जबाबत दिलासा देण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्न करत आहे.'' 

यावेळी युवा सेनेच्या रोजगारनिर्मिती जॉबचे अनावरण श्री. राऊत यांच्या हस्ते झाले. आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद शिवसेना गटनेते नागेंद्र परब, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा परिषद सदस्य वर्षा कुडाळकर, अमरसेन सावंत यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

इशारा काफी है! 
महाविकास आघाडीच्या माध्यमातून काम करताना संयमी नेतृत्व असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना कालावधीत महत्त्वाचे निर्णय घेऊन प्रत्यक्षात साकारले. त्यांच्या या कार्याची दखल देशपातळीवर घेतली गेली आणि ते सध्या पाचव्या क्रमांकाचे टॉप मुख्यमंत्री ठरले आहेत. अशावेळी राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल, असे म्हणणाऱ्यांकडे आम्हाला लक्ष द्यायला वेळ नाही. पोपटपंची करणाऱ्यांसाठी "इशारा ही काफी है' असे श्री. राऊत यांनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com