esakal | आंदोलनाचे पहिले पाऊल : रत्नागिरीत शुक्रवारी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
sakal

बोलून बातमी शोधा

whole Maratha community is united and aggressive again Maratha reservation postponed Statement to be given on Friday

मराठा आरक्षण स्थगिती; शुक्रवारी देणार निवेदन

सकल मराठा समाज एकजुटीने पुन्हा आक्रमक

आंदोलनाचे पहिले पाऊल : रत्नागिरीत शुक्रवारी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

sakal_logo
By
मकरंद पटवर्धन

रत्नागिरी : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती आदेश दिला. मराठा आरक्षण हे हक्काचे असून ते मिळवण्यासाठी सकल मराठा समाज पुन्हा एकजुटीने उभा राहत आहे. सरकारच्या भूमिकेबाबत संपूर्ण सकल मराठा समाजाने आपापल्या प्रतिक्रिया आणि निषेध नोंदवण्यासाठी येत्या शुक्रवारी ( 18) सकाळी दहा वाजल्यापासून तालुक्यातील विविध विभागांमार्फत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात येणार आहे. आंदोलनाचे हे पहिले पाऊल असून भविष्यात प्रचंड मोठ्या संख्येने मोर्चेसुद्धा काढण्यात येतील.


न्यायालयाच्या निर्णयानंतर सकल मराठा समाजामध्ये प्रचंड प्रक्षोभ निर्माण झाला. मराठा समाजाने अनेक आंदोलने केली, अनेकांनी बलिदान दिले. त्यामुळे शासनाला हक्काचे आरक्षण देण्यास भाग पडले. त्यामुळे विद्यार्थी, तरुण बेरोजगार अशा अनेक घटकांना नोकरीमध्ये, शैक्षणिक प्रवेश यामध्ये मोठ्या प्रमाणात संधी प्राप्त झाली. इतरही काही सुविधा मिळू लागल्या. परंतु काही विघ्नसंतोषी मंडळींना ते पाहवले नाही आणि तिथेच खरा घात झाला. न्यायालयाच्या निकालाने सकल मराठा समाजाच्या स्वप्नांवर विरजण पडले. थोडक्यात एवढा हातातोंडाशी आलेला घास आज तोंडातून बाहेर काढण्याचा प्रयत्न काही मंडळी करीत आहेत. एवढ्या मेहनतीने मिळवलेले यश एवढ्या सहजासहजी वाया जाऊ द्यायचे नाही, हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी निषेध म्हणून आंदोलनाच्या हालचाली, विविध स्तरावर बैठका चालू झाल्या. पुन्हा तेवढ्याच ताकदीने संघर्ष करून हे आरक्षण मिळावावेच लागेल, याकरिता मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

हेही वाचा- सवय जडली ;  अभ्यास कमी, अन्‌  मोबाईल गेम जादा

महाराष्ट्र राज्य समन्वय समितीच्या धोरणानुसार अंतरिम स्थगिती त्वरित उठवावी व या स्थगितीमुळे विद्यार्थी प्रवेश व नोकर भरती यासंदर्भातील सुविधा पुन्हा प्राप्त होतील, यासाठी शासनाने ठाम भूमिका घेऊन पुढील कार्यवाही तातडीने करण्याची विनंती सकाल मराठा समाजाने केली आहे. सध्या सर्वत्र कोरोना महामारीमुळे कायदेशीर बंधने पाळून स्वयंशिस्तीने विभागवार जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात येणार आहेत. यासंदर्भात मराठा समाजाच्या वतीने दिनेश सावंत, सुधाकर सावंत, अ‍ॅड. अजय भोसले, संतोष तावडे, केशव इंदुलकर, कौस्तुभ सावंत, नंदू चव्हाण यांनी आवाहन केले आहे.

संपादन -  अर्चना बनगे

loading image