
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथील एका सभेत शेतकऱ्यांना नको असल्यास हा महामार्ग होणार नसल्याचे सांगत दुसऱ्या दिवशी महामार्ग रद्दची अधिसूचना काढली होती.
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या भागातून शक्तिपीठ महामार्ग (Shaktipeeth Highway) नेण्याचा घाट शासन घालत असताना या भागाचे सत्ताधारी पक्षाचे आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यावर गप्प का? असा प्रश्न करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया द्यावी, असे आवाहन शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीचे कॉम्रेड संपत देसाई यांनी येथे केले. देसाई यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवाजीराव मगदूम, सम्राट मोरे, मच्छिंद्र मुगडे, राजेंद्र कांबळे, शब्बीर मणियार, राजश्री भगत, सिंथिया रॉड्रिक्स, प्रबोधिनी देसाई आदी उपस्थित होते.