Pali News : रायगड जिल्ह्याच्या मानद वन्यजीव रक्षकपदी माणगांवचे वन्यजीव अभ्यासक, छायाचित्रकार शंतनु कुवेसकर यांची नियुक्ती

माणगांवचे वन्यजीव अभ्यासक, निसर्ग छायाचित्रकार आणि माहितीपट निर्माते शंतनु कुवेसकर यांची महाराष्ट्र शासनाच्या वनविभागामार्फत रायगड जिल्ह्याच्या मानद वन्यजीव रक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.
shantanu kuveskar

shantanu kuveskar

sakal

Updated on: 

पाली - रायगड जिल्ह्याच्या समृद्ध जैवविविधतेचे जतन, वन्यजीवांचे संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने कार्यरत असलेले माणगांवचे वन्यजीव अभ्यासक, निसर्ग छायाचित्रकार आणि माहितीपट निर्माते शंतनु कुवेसकर यांची महाराष्ट्र शासनाच्या वनविभागामार्फत रायगड जिल्ह्याच्या मानद वन्यजीव रक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या दीर्घकाळच्या वन्यजीव अभ्यास, जनजागृती, वन्यजीव बचावकार्य आणि निसर्ग संवर्धनाच्या कामाला या नियुक्तीमुळे अधिकृत स्वरूपाची नवी जबाबदारी आणि शासनाकडून ओळख मिळाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com