राजापूर : गेल्या काही वर्षांत माॅन्सूनचे वेळापत्रक (Monsoon Schedule) बदलले आहे. वेधशाळेचे अंदाजही चुकीचे ठरत आहेत. या परिस्थितीत माॅन्सूनच्या आगमनाची साऱ्यांना आधीच चाहूल देणाऱ्या नवरंग पक्ष्याचे (Navrang Bird) कोकणात आगमन झाले आहे. त्यामुळे यावर्षी मोसमी पाऊस लवकर सुरू होईल, या वेधशाळेच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. वाढता उष्मा, पाणीटंचाई यामधून नवरंगाचे आगमन सर्वांनाच दिलासा देणारे आहे.