
महाआवास अभियान (ग्रामीण) २० नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत राबविण्यात येत आहे.
रत्नागिरी : ग्रामीण गृहनिर्माण योजना गतिमान करण्यासाठी महाआवास अभियान (ग्रामीण) २० नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत राबविण्यात येत आहे. यामध्ये राज्यात ८ लाख तर रत्नागिरी जिल्ह्यात ३ हजार ३१८ घरकुले बांधायचे लक्ष्य निश्चित केले आहे. हे अभियान प्रभावीपणे राबवा, अशा सूचना विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केली.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित महाआवास अभियान ग्रामीण विभागीय कार्यशाळेत ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालय येथून निवासी उपजिल्हधिकारी दत्ता भडकवाड, जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी घाणेकर, सहाय्यक संचालक समाजकल्याण चिकणे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी संतोष गमरे उपस्थित होते.
हेही वाचा - रात्री गारठा तर दिवसा ढगाळ वातावरण
या प्रसंगी मिसाळ म्हणाले, उत्तम गुणवत्तेचे घरकुल उभारण्यासाठी प्रशिक्षित गंवडी आवश्यक आहेत. त्यासाठी तालुकास्तरावर प्रशिक्षण दिले पाहिजे. घरकुलाचे डेमो हाऊस पंचायत समिती आवार किंवा रस्त्यावरील गावांच्या ठिकाणी, वर्दळ अधिक असेल अशा ठिकाणी दाखवा. विविध योजनांमधील प्रलंबित कामांचा जिल्हाधिकारी यांनी सविस्तर
आढावा घ्यावा.
या योजनेत सामाजिक संस्थाचा सहभाग घ्यावा. अपूर्ण घरकुलांचा वेगळा आढावा घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करावी. घरकुलांना मंजूरी, मंजूर घरांना पहिला हप्ता, घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे, प्रलंबित घरकुल पूर्ण करणे, ग्रामीण गवंडी प्रशिक्षण , डेमो हाऊस उभारणे, आधारसिडींग पूर्ण करणे आदी कामे विहित मुदतीत पूर्ण करा.
तालुका लक्ष्य
चिपळूण १९३
दापोली ५६६
गुहागर ३२७
खेड ६३१
लांजा ६३
मंडणगड ४१२
राजापूर २५३
रत्नागिरी ३९५
संगमेश्वर ४७८
हेही वाचा - बापरे! बोरज धरणात फक्त महिनाभर पुरेल इतकेच पाणी -
संपादन - स्नेहल कदम