तासाभरातच बिबट्याने घेतला सुटकेचा श्वास ; कुठे घडली घटना ?

रवींद्र साळवी
Saturday, 29 August 2020

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले

लांजा : भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत शिरलेला बिबट्या तारेमध्ये अडकल्याची घटना आज सकाळी लांजा शहरातील खावाडकरवाडीमध्ये घडली. दरम्यान वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याची यशस्वी सुटका करून त्याला चांदोलीतील अभयारण्यात सोडले.

लांजा खावाडकरवाडीमध्ये चंद्रकांत गुरव यांच्या घराशेजारील भात शेतीला लागून कंपाउंड तारे मथ्ये बिबट्या अडकलेला होता. वन विभागाने प्रसंगावधान राखून तासाभरात बिबट्याची तारेतून सुटका केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. 

हेही वाचा - कोकणात साडे तीन लाख थाळयांनी भागवली गरजूंची भूक...

हे बचाव कार्य विभागीय वन अधिकारी र. शी. भवर यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेत्र वन अधिकारी प्रियंका लगड, लांजा वनपाल, सागर पाताडे, वनपाल देवरुख, सुरेश उपरे, वनरक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पार पडले.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: within one hour the leopard escape in cable gates the forest officials rescue in ratnagiri