
रत्नागिरी ; मुंबई-गोवा महामार्गावरील पाली-खोपोलीनजीक कुरवले फाटा येथील रस्त्यावर म्हैस आडवी आल्याने मोटारीचा अपघात झाला. या अपघातील कुर्णे (ता. लांजा) जखमी महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. सलोनी दिनेश खाके (वय २८, रा. कसोप फाटा, रत्नागिरी, मूळ रा. कुर्णे, ता. लांजा) असे मृत महिलेचे नाव आहे. हा अपघात बुधवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास खोपोली-करवले फाटा येथे झाला.