तरुणीने केली फेसबुकवरून महिलांची बदनामी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

चिपळूण - प्रेमभंग झालेल्या चिपळुणातील एका तरुणीने तिच्या प्रियकराच्या नावे फेसबुकचे अकाऊंट सुरू करून महिलांचे अश्‍लील फोटो टाकण्यास सुरवात केली. प्रियकाराला अद्दल घडविण्यासाठी तिने हे कृत्य केले. मात्र, पोलिसांच्या तपासात ती सापडली. 

चिपळूण - प्रेमभंग झालेल्या चिपळुणातील एका तरुणीने तिच्या प्रियकराच्या नावे फेसबुकचे अकाऊंट सुरू करून महिलांचे अश्‍लील फोटो टाकण्यास सुरवात केली. प्रियकाराला अद्दल घडविण्यासाठी तिने हे कृत्य केले. मात्र, पोलिसांच्या तपासात ती सापडली. 

याबाबत चिपळूण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार काही महिलांचे अश्‍लील फोटो व मेसेज फेसबुकवरून टाकले जात होते. फेसबुकवरून राज्याच्या वेगवेगळ्या भागात हे अश्‍लील फोटो फिरत असल्याचे संबंधित महिलांच्या नातेवाइकांच्या लक्षात आले. त्यांनी यासंदर्भात चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता, एका पुरुषाच्या नावे ते अकाऊंट असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर फेसबुकवरील तो अकाऊंट पुरुषाच्या नावे असला, तरी एक महिला चालवित असल्याचे लक्षात आले. 

पोलिसांनी संबंधित तरुणीचा शोध घेतला असता, ती चिपळुणातील असल्याचे समजले. दरम्यान, पोलिसांनी तिला अटक केली असून तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

लग्नास नकार दिला म्हणून...
 पोलिसांनी तिचा शोध घेऊन अधिक चौकशी केल्यावर ती मुंबईत शासकीय नोकरीत असल्याचे समोर आले. तिचे एका तरुणाशी प्रेम संबंध जुळले होते. नंतर त्या तरुणाने लग्नास नकार दिला. म्हणून त्या तरुणाच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते तयार करून महिलांची बदनामी करण्यास सुरवात केली. संबंधित तरुण या प्रकरणामध्ये अडकावा व त्याला शिक्षा व्हावी, असा त्यामागचा हेतू होता. पण पोलिसांच्या तपासात ती स्वतः अडकली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women vilification on Facebook by young girl