निवडणुक आखाड्यातील उमेदवारांच भवितव्य महिलांच्या हाती

women voters extra for election and the future of candidates depends on women in ratnagiri
women voters extra for election and the future of candidates depends on women in ratnagiri
Updated on

राजापूर (रत्नागिरी) : तालुक्‍यातील १०१ पैकी ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरवात झाली आहे. त्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांकडून आपापली ताकद आजमावली जाणार असल्याने इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी होण्याची शक्‍यता आहे. या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार बजावणाऱ्या मतदारांमध्ये पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांची मतदार ३ हजार ५११ आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यातील उमेदवारांच्या भवितव्याची दोरी महिलांच्या हाती राहणार आहे.   

कोरोनाच्या महामारीमुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामध्ये तालुक्‍यातील १०१ पैकी ५१ ग्रामपंचायती निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये १५६ प्रभागातील ३९९ जागांसाठी लढत होणार आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीला कालपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून सुरवात झाली आहे. तर, पुढील महिन्यामध्ये (ता. १५) त्यासाठी मतदान होणार आहे. 

ग्रामीण भागातील राजकारणावरील राजकीय वर्चस्वाच्यादृष्टीने या ग्रामपंचायत निवडणुकीला राजकीयदृष्ट्या महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी ग्रामपंचायत निवडणुका प्रतिष्ठेच्या करीत आपापल्या पक्षाची पॅनेल उभी करण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामध्ये काही गावांमधील काही राजकीय पक्षांच्या उमेदवारी निश्‍चित झाली आहेत. 

२५ हजार ५८९ पुरुष, तर २९ हजार १०० महिला

या निवडणुकीमध्ये ५४ हजार ६८९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात २५ हजार ५८९ पुरुष, तर २९ हजार १०० महिला मतदारांचा समावेश आहे. त्यामध्ये पुरुष मतदारांच्या तुलनेमध्ये ३ हजार ५११ महिला मतदारांची संख्या जास्त आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यातील उमेदवारांचे भवितव्य महिला मतदारांच्या हातामध्ये राहणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिला मतदारांना मतदानासाठी उद्युक्त करण्याचे आव्हान राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांच्या कार्यकर्त्यांसमोर राहणार आहे.      

दृष्टिक्षेपात राजापूर

  • एकूण ग्रामपंचायती                        १०१
  • निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती        ५१
  • प्रभाग                                         १५६
  • जागा                                           ३९९ 
  • एकूण मतदार                            ५४६८९

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com