womens-day : जागतिक संकटातही मुलींनी दाखवली हिंमत

दत्तक गावांना सांभाळले सोनाली पांडुरंग चव्हाण
सोनाली चव्हाण
सोनाली चव्हाणsakal
Updated on

सोनाली चव्हाणचे बालपण शेतकरी कुटुंबामध्ये गेले. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रश्न तिने जवळून पाहिले होते. त्यामुळे टाळेबंदीच्या काळात तिने लिंगीवरे, माडगुळे, बनपुरी, कौठुळी व पावाडी ही पाच गावे दत्तक घेऊन आपले काम सुरू केले. लसीकरणाबाबतच्या अफवा दूर करण्यासाठी तिने सायकल रॅली काढली. दुसऱ्या लाटेत खाटा, ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू नये म्हणून अहोरात्र कार्यरत राहून कोविड केअर सेंटर उभारले. लसीकरणासाठी प्रत्येक घरी भेट देऊन लोकांना समजावून सांगितले. टाळेबंदी असली तरी प्रमुख लोकांच्या मदतीने आणि ‘एनएसएस’च्या साहाय्याने स्वच्छ व सुरक्षित गाव बनवण्यासाठी गावातील कचरा दूर करून लोकांना सुरक्षित ठेवणे, ही आपली जबाबदारी समजून घरोघरी जाऊन त्यांनी सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप केले. ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ समजून युवकांना रक्तदानासाठी प्रेरित केले.

आर्थिक पाठबळ नसतानाही लोकांना मदत करणे, या ध्येयाने कार्य करणे तसे अवघड असते, तरीही आपल्या कार्याच्या जोरावर सर्वतोपरी मदत तिने सुरू ठेवली. केवळ समाजसेवेची आवड, इतरांना नेहमी मदत करण्याची वृत्ती यामुळे हे शक्य झाले. प्रचंड इच्छाशक्ती असेल तर कोणतेही कार्य अशक्य नाही.

- सोनाली चव्हाण

मुंबई: कोरोना संकटाने संपूर्ण जगाला विळखा घातलेला असताना मुलींनी, महिलांनी हिंमत दाखवून आपला ठसा उमटविल्याची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. या मुलींनी आपल्या कृतीतून एक आदर्श निर्माण केला. आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या मुलींपैकी दोघींबद्दल जाणून घेऊया!

‘कम्युनिटी किचन’ची उभारणी सना इरफान कुंवारी

जी. एम. मोमीन महिला महाविद्यालय, भिवंडी, जि.ठाणे समाजसेवेची आवड असलेल्या, संवेदनशीलतेचा वसा कुटुंबातूनच मिळालेल्या सना इरफान कुंवारीने कोरोना काळात, घरातच स्वत:च्या सुरक्षित कोषात बसण्यापेक्षा रस्त्यावर उतरून काम करण्याचं ठरवले. सुरुवातीला तिच्या नातेवाइकांसह तिने लोकांना अन्नधान्य वाटण्याची सुरुवात केली. पण हे अन्न शिजवायचा श्न होता. मग तिने त्याच परिसरात ‘कम्युनिटी किचन’सुरू केलं.‘एनएसएस’चे कार्यक्रम अधिकारी आणि विद्यार्थी यांच्या मदतीने हे किचन चालवण्याकरता तिनं दोन लाखांचा निधी उभा केला. दररोज पंधरा लोक अन्न शिजवण्यासाठी काम करत. १५०० जणांना दररोज सकाळचा नाश्ता आणि दोन्ही वेळचं जेवण दिले जात असे. सनाने या किचनमध्ये भाज्या चिरण्यापासून, जेवण वाढेपर्यंत पडेल ते काम केले.

हे काम करताना सनाने ‘कम्युनिटी किचन’बाबत काही समाजकंटकांनी पसरवलेल्या,‘हे मुस्लीम लोक, शाकाहारी-मांसाहारी जेवण एकाच भांड्यांमध्ये बनवतात.’ या गैरसमजाला बळी पडलेल्या लोकांना प्रत्यक्ष ‘कम्युनिटी किचन’मध्ये नेऊन वस्तुस्थिती दाखवली.

जेवणाच्या रांगेत उभ्या असणाऱ्या गरजूंना तर आपण जात-धर्म विचारून जेवण वाढत नाही. पण तरीही हिंदू धर्मियांच्या श्रद्धांचा आदर म्हणून आम्ही शाकाहारी आणि मांसाहारी स्वयंपाकाला वेगवेगळीच भांडी वापरत होतो. पण समाजात चांगलं काम करत असताना त्रास देणारे चार-दोन लोक असतातच. मी प्रत्यक्ष किचन दाखवल्यावर गैरसमज दूर झाला.

- सना इरफान कुंवारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Rajapur's Historic British-Era Warehouse Gets New Life with ₹2 Crore Restoration
Adani, Reliance, NTPC MoUs Signed; Konkan Nuclear Project Site Not Finalised
Ratnagiri food safety raid on fake paneer
Mumbai Goa Highway landslide update
Marathi News Esakal
www.esakal.com