मुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्ठी पुलाचे काम पडले बंद

मुंबई - गोवा महामार्गाच्या वाहतुकीसाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा मानला जातो
मुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्ठी पुलाचे काम पडले बंद
Updated on

चिपळूण : चार वर्षांपासून सुरु असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील (mumbai-goa highway) चिपळूण (chiplun)वाशिष्ठी पुलाचे(vashishthi bridge) काम आज अचानक बंद करण्यात आले आहे. नागरिकांच्या व स्थानिक प्रशासनाच्या दबावामुळे गणेशोत्सवापूर्वी पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी खुली करून देण्यात आली होती , त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला होता.

मुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्ठी पुलाचे काम पडले बंद
Chiplun : निधीची ठोस तरतूद होईपर्यंत लढा

वाशिष्ठी पूल हा मुंबई - गोवा महामार्गाच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो , जर हा पूल बंद झाला तर महामार्गावरील अवजड वाहतूक पूर्णपणे बंद होते . वाशिष्ठी पुलाचे काम अचानक बंद करण्यात आले असून , तेथील काम करणारा कामगार वर्ग सुद्धा आपल्या गावाकडे परतीचा मार्ग स्वीकारला आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे सुद्धा काम का बंद करण्यात आले याचे उत्तर नव्हते , त्यामुळे नागरिकांमध्ये वाहन चालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्मण झाले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्ठी पुलाचे काम पडले बंद
निळवंडेसाठी निधीची तरतूद का नाही? - राधाकृष्ण विखे पाटील

एक पूल पूर्ण झाला असून एका पुलाचे काम चालू होते ते बंद झाले असून हा पूल दिवाळीनंतर किंवा डिसेंबर महिनाअखेर वाहतुकीला खुला होणार होता मात्र या पुलाचे नक्की आता काय होणार , खरोखरच हा पूल चालू होणार की नाही , मुंबई-गोवा महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार या सगळ्याच चिंता वाहनचालकांमध्ये प्रश्न निर्माण करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Heavy rainfall in Raigad district pushed the Amba River above the danger level, disrupting traffic and prompting flood alerts.
Malvan primary school teacher transfer protest
When will Ratnagiri Airport start commercial flights?
Ratnagiri Buddha Vihar development project controversy
Marathi News Esakal
www.esakal.com