Pali News: सुधागडमध्ये 'नरेगा' अंतर्गत कामाची सुरुवात, वन व्यवस्थापनातून शाश्वत रोजगारची शाश्वत हमी; आदिवासी समूहाचे स्थलांतर थांबणार ..

Pali News: वनांचे संरक्षण, संवर्धन व शाश्वत व्यवस्थापणातून स्थानिक आदिम आदिवासी लोक समुदयांना शाश्वत रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.
Work under NREGA has begun in Sudhagad
Work under NREGA has begun in Sudhagadsakal
Updated on

पाली: सुधागड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चिवे येथील सामूहिक वनहक्क मान्यता प्राप्त वन क्षेत्र, कंपार्टमेंट नंबर ६५१ मध्ये मजरे जांभूळपाडा आदिवासी वाडीतील सर्व कुटुंबांना गुरुवार (ता. 4) पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कामांना सुरुवात झाली. वनांचे संरक्षण, संवर्धन व शाश्वत व्यवस्थापणातून स्थानिक आदिम आदिवासी लोक समुदयांना शाश्वत रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.

या अंतर्गत मंजूर वन तलावासाठी 5 लाख 28 हजार 908 (५२८९०८) रुपये इतका निधी मंजूर झाला असून या कामांतर्गत १९७६ इतक्या लोकांना रोजगार मिळणार आहे. या कामांतर्गत मौजे मजरे जांभूळपाडा येथील आदिम आदिवासी लोकसमुदायांना शाश्वत रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.

मजरे जांभूळपाडा या गावला २०१९ साली काँपार्टमेंट नंबर ६५१ मधे एकूण १३९.५ एकर इतक्या वन क्षेत्रावर वनहक्क कायदा २००६ चे कलम ३(१) अंतर्गत सामूहिक वनहक्क अधिकार मान्यता प्राप्त झाले आहेत. या सामूहिक वनहक्क क्षेत्राच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी सबंधित सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती, मजरे जांभूळपाडा व वन विभाग, सुधागड पाली यांनी संयुक्तरित्या सूक्ष्म नियोजन केले होते. या सूक्ष्म नियोजनाची अंमलबजावणीं करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कामे प्रस्तावित करण्यात आली होती.

उपवनसंरक्षक, अलिबाग राहुल पाटील यांनी या गावला भेट देऊन स्थानिक आदिम आदिवासी लोक समुदायाच्या स्थलांतराची व वन व्यवस्थापनासाठी तयार केलेल्या सूक्ष्म नियोजनाचा प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला होता. प्रस्तावित कामे ही वनीकरणाच्या अनुषंगाने महत्वपूर्ण ठरणार असल्याने व स्थानिक आदिवासी लोक समुदायातील नागरिकांचे स्थलांतर कायमचे थांबवण्यासाठी प्रस्तावित सर्व कामांना तत्काळ तांत्रिक मंजुरी देण्याचे निर्देश उपवनसंरक्षक यांनी सबंधित वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले होते.

सामूहिक वनहक्क वन क्षेत्रात मंजूर वन तळे खोदण्याचे काम सुरू करण्यात आले. यावेळी सुधागड तालुक्याचे वन प्रिकहेटर अधिकारी दादासाहेब कुकडे, सरपंच रोहिदास सखेकर, वनपाल मनोज साळवी, संकेत गायकवाड, वनरक्षक विनोद चव्हाण, कार्यक्रम व अभियान प्रमुख, वातावरण फाऊंडेशन राहुल सावंत, अंकुश लोणकर, शिवाजी हिरडे, रमेश साखरे, तालुका समन्वयक, वातावरण फाऊंडेशन व सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती, मजरे जांभूळपाडा चे सदस्य उपस्थित होते.

Work under NREGA has begun in Sudhagad
आदिवासी आश्रमशाळेत मुलांच्या जीवाशी खेळ; पाहा व्हिडिओ

राज्यातील पहिले गाव

अनुसूचित क्षेत्र लागू नसलेल्या (Non PESA Area) सामूहिक वनहक्क मान्यता प्राप्त वन क्षेत्रात नरेगा अंतर्गत काम सुरू होणारे मजरे जांभूळपाडा हे महाराष्ट्रातील कदाचित पहिले गाव असावे. हे विशेष करून लक्षात घेण्यासारखे आहे. असे वातावरण फाऊंडेशनचे कार्यक्रम व अभियान प्रमुख राहुल सावंत म्हणाले.

कोट्यावधीच्या कामांना मंजुरी

या प्रस्तावित कामांतर्गत वन तलाव बांधणे, वृक्ष लागवड करणे, अनघड दगडी नालाबांध बांधणे व नर्सरी उभारणेसाठी एकुण २४७९३९२ इतक्या निधीच्या कामांना तंत्रित तसेच प्रशाकीय मंजुरी देण्यात आली असून या अंतर्गत ८२४२ इतक्या मनुष्यांना दिवसांचा रोजागर निर्माण होणार आहे.

रोजगार हमी योजने अंतर्गत कामे कशाला करता ते तुम्हाला परवडणार नाही, ही कामे कधी मंजूर होणार नाहीत, या सगळ्या भुलथपा आहेत असे सांगून आम्हा आमच्या गावातून धंद्यासाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न अनेक ठेकेदारांनी केला. मात्र आम्हाला राहुल पाटील साहेबावर विश्वास होता. आणि आज तो सिद्धाही झाला. आम्ही त्यांचे आभार मानतो असे मत भारती पवार, सदस्य सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती, मजरे जांभूळपाडा यांनी व्यक्त केले.

Work under NREGA has begun in Sudhagad
आदिवासी प्रकल्प कार्यालयात २० लाखांचा गैरव्यवहार ! 

रोजगार हमी योजनेतून मिळणारे काम हे आम्हाला रोजगार उपलब्ध करून देणार तर आहेच, रोजगारा बरोबरच आमच्या सामुहिक वनहक्क वन क्षेत्राचे संरक्षण, संवर्धन आणि व्यवस्थापन आम्ही सर्व मजरे जांभूळपाडा आदिवासी वाडीचे नागरिक मिळून करणार आहोत. सुभाष जाधव, सचिव सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती, मजरे जांभूळपाडा स्थलांतराचा फास आमच्या गळ्यातून निघाला आहे, असे म्हणायला हरकत नाही. आम्हाला आता गाव सोडून बाहेर जावे लागणार नाही. गावातच रोजगार मिळाल्यामुळे आमची मुलंबाळ शिकू शकतील याचा आम्हाला आनंद आहे. अनंता वाघमारे, अध्यक्ष, सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती, मजरे जांभूळपाडा सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती, मजरे जामभूळपाडा ही आमची समिती वन रक्षणाच्या अनुषंगाने निश्चित आदर्शवत पायंडा पडणार आहे. त्यामुळे या मोहिमेत ग्रामपंचायत पातळीवर जी काही मदत या समितीला लागणार आहे ती सर्वोतपरी मदत करायला आमची ग्रामपंचायत सज्ज आहे. वन रक्षणाच्या मोहिमेत इतर ग्रामपंचायतींनीही सक्रिय सहभाग घ्यायला हवा. रोहिदास साजेकर, सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत, चिवे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com