कर्नाटकातील शिवनी येथून सिमेंट घेऊन कल्लू गुलाबसिंग रजपूत (वय ३०) आणि रहमान मानगुल हे आज ट्रकमधून कणकवलीत (Kankavali) आले होते.
कणकवली : गोदामामध्ये सिमेंटची पोती (Cement Bag) उतरण्याचे काम सुरू असताना एका कामगाराचा मृत्यू झाला. रहमान अब्दुल मानगुल (वय ५६, रा. संकेश्वर, ता. चिक्कोडी, बेळगाव) असे त्याचे नाव आहे. आज सकाळी ११.१० च्या दरम्यान ही घटना घडली.