esakal | कोकणात अधिक मासात लेखक वाचकांच्या भेटीला ; रसिकांना मिळणार सांस्कृतिक मेजवानी
sakal

बोलून बातमी शोधा

writers are interaction with readers with the help of art circle in ratnagiri

येत्या शुक्रवारपासून (18) महिनाभर दररोज वाचन वसाचा आस्वाद घेता येईल

कोकणात अधिक मासात लेखक वाचकांच्या भेटीला ; रसिकांना मिळणार सांस्कृतिक मेजवानी

sakal_logo
By
मकरंद पटवर्धन

रत्नागिरी : अधिक मासामध्ये सर्वत्र जावयाला 30-3 चे वाण देण्याची पद्धत आहे. 30-3 अनारसे किंवा बत्तासे अशा पदार्थांचा या वाणामध्ये समावेश असतो. हाच धागा पकडून रसिकांना दर्जेदार पुस्तकांच्या अभिवाचनाचे वाण आर्ट सर्कल संस्थेतर्फे देण्यात येणार आहे. येत्या शुक्रवारपासून (18) महिनाभर दररोज वाचन वसाचा आस्वाद घेता येईल.

हेही वाचा - भंगारात काढायचे की, दुरुस्त करायचे ? अखेर त्या जहाजाचा होणार निर्णय

लॉकडाउनच्या काळात 2 मे पासून संस्था नवनवे उपक्रम राबवत आहे. कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर फेसबुक आणि यू ट्युबसारख्या माध्यमांचा वापर करत रसिकांना सांस्कृतिक मेजवानी देण्याचे काम संस्था करत आहे. अधिक मासानिमित्त नव्याने प्रकाशित झालेली नव्या लेखकांची 30 पुस्तके आणि 3 बालसाहित्यातील पुस्तके अशा 33 पुस्तकांच्या काही भागाचे अभिवाचन करण्यात येणार आहे. हा उपक्रम 16 ऑक्टोबरपर्यंत महिनाभर दररोज सायंकाळी 7 वाजता चालणार आहे.

अक्षय वाटावे, गोपाळ जोशी, गंधार जोशी, मयुरा जोशी, रमा रानडे, स्वानंद देसाई, अभिजित शेलार, हृषीकेश शिंदे, मनोज भिसे, सायली खेडेकर, दीप्ती कानविंदे, कश्ती शेख, नीता कुलकर्णी हे अभिवाचन करतील. हे सर्व नाट्यकलाकार आहेत. वाचनाला अभिनयाची जोड देत पुस्तक अधिक प्रभावीपणे रसिकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत. यात सर्व नवीन प्रकाशित पुस्तकांचा समावेश आहे. सध्या बंद असल्याने या उपक्रमातून वाचकांना नवीन संदर्भ, नवीन विषय सर्व यानिमित्ताने अनुभवता येणार आहेत.

हेही वाचा -  कोयना प्रकल्पाच्या सर्जवेलमधील गळती काढण्यासाठी हालचाली सुरु

लेखकसुद्धा येणार भेटीला

अरुण काकडे, सचिन कुंडलकर, गणेश मतकरी, डॉ. आशुतोष जावडेकर, अवधूत डोंगरे, रश्मी कशेळकर, करण जोहर (अनुवाद नीता कुलकर्णी), किरण येले, प्रणव सखदेव, भूषण कोरगावकर, हृषीकेश गुप्ते, मोहना जोगळेकर, मृदुला दाढे-जोशी, नंदिनी देसाई, शरदच्चंद्र चिरमुले, प्रवीण बांदेकर आदी लेखकांच्या लेखनाचे वाचन होईल. यातील अनेक लेखक अभिवाचनानंतर लगेचच रसिकांच्या थेट भेटीला येणार आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

loading image