esakal | पक्ष प्रवेशाचे नाट्य म्हणजे मुख्यमंत्र्यांचा अपमान; बडतर्फे केलेलेच शिवसेनेत
sakal

बोलून बातमी शोधा

yogesh patankar

पक्ष प्रवेशाचे नाट्य म्हणजे मुख्यमंत्र्यांचा अपमान; BJP चा दावा

sakal_logo
By
संतोष कुलकर्णी

देवगड (सिंधुदुर्ग): भाजपमधून बडतर्फ केलेल्या नगरसेविका हर्षा ठाकूर यांचा मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्ष प्रवेशाचे नाट्य म्हणजे शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचा केलेला अपमान आहे, असा टोला भाजपचे देवगड जामसंडे शहराध्यक्ष योगेश पाटकर यांनी लगावला आहे. त्यांच्या शिवसेना प्रवेशाचा नगरपंचायतीवर काहीही परिणाम होणार नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. नगरसेविका हर्षा ठाकूर तसेच नगरसेवक विकास कोयंडे यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाच्या अनुषंगाने पाटकर माध्यमांशी बोलत होते.

पाटकर म्हणाले, हर्षा ठाकूर आणि विकास कोयंडे यांनी मुंबईत जावून शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समक्ष प्रवेश करण्याचे नाट्य केले तेच मुळात मुख्यमंत्री ठाकरे यांचे अपमान करणारे आहे. याचे कारण, काही माहिन्यापूर्वी भाजप तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर यांनी हर्षा ठाकूर यांना पक्षातून बडतर्फ केले होते. त्यामुळे ज्यांना पक्षानेच बडतर्फ केले आहे.

ज्यांची पक्षानेच हकालपट्टी केली आहे. अशांचा प्रवेश शिवसेनेमध्ये करून घेणे म्हणजे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा कळत नकळतपणे शिवसेना नेते अपमान करीत आहेत हे त्यांना कदाचित समजले नसेल. त्यामुळे पक्ष प्रवेश करून घेण्याआधी शिवसेना नेत्यांनी किमान दहा वेळा तरी विचार केला पाहिजे होता. या गोष्टीचे विश्‍लेषण भाजप आमदार नीतेश राणे यांनी फक्त दोन शब्दात केले आहे. आणि ते दोन शब्द म्हणजे ‘येड्यांची जत्रा’. त्यामुळे यावर अजून काही भाष्य करण्यासारखे त्यांनी ठेवलेलेच नाही. ही येड्यांची जत्रा असल्याने येथील देवगड जामसंडे नगरपंचायतीवर प्रभाव पडणार नाही किंवा नगरपंचायतीला कोणताही धक्का लागणार नाही.

loading image
go to top