१५ एकर क्षेत्रांवर हंगामानुसार ते शेती करत आहेत. कंदमुळाचे सर्वाधिक पीक घेणारे तालुक्यातील एकमेव शेतकरी आहेत.
दापोली : मेहनतीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शेतीमधूनही उत्पन्न घेता येते, हे चिखलगाव येथील उत्तम भुवड या पदवीधर तरुणाने (Graduated Youth) दाखवून दिले आहे. कला शाखेतून पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उत्तम याने वडिलोपार्जित शेतीकडे लक्ष दिले. पावसाळ्यात भातशेती आणि त्यानंतर पालेभाजी, फळभाजी, कंदमुळे, कलिंगड लागवड (Tubers, Watermelon Cultivation) करत वर्षाला सुमारे चार लाख रुपयांचे उत्पन्न भुवड मिळवत आहेत.