पाली - पाली-खोपोली राज्य महामार्गावर शेंबडी गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकल अपघातात गंभीर जखमी तरुणाचा शुक्रवारी (ता.7) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे..याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुधागड तालुक्यातील कानसळ गावचा तरुण सिद्धार्थ कांबळे बुधवारी (वय. २८) रात्री साडे आठ ते नऊच्या सुमारास त्याचा नातेवाईक मनोज क्षीरसागर राहणार हाळ ता. खालापूर याच्यासह आपल्या जवळील मोटारसायकल वरून कानसळ गावातून खोपोलीच्या दिशेने जात होता. यावेळी शेंबडी गावच्या हद्दीतील वळणावर अज्ञात वाहनाच्या धडके त्यांचा अपघात झाला..या अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या अपघातात दोघांच्याही डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. यावेळी त्यांची तब्बेत अतिशय चिंताजनक होती. मात्र शुक्रवारी (ता. 6) सिद्धार्थ कांबळे याची उपचारदरम्यान प्राणज्योत मावळली..सिद्धार्थ कांबळे होमगार्ड या सेवेत काम करीत होता. सिद्धार्थचा मोठा भाऊ राहुल कांबळे हे कानसळ गावचे पोलीस पाटील आहेत. त्यामुळे सिद्धार्थ ने महाराष्ट्र पोलिस दलात भरती व्हावे अशी त्यांची प्रबळ इच्छा होती..सिद्धार्थ देखील तशा प्रकारे तयारी करीत होता. मात्र त्याचे स्वप्न कायमचे अपूर्ण राहिले. सिद्धार्थ याच्या जलदानविधी व शोकसभेचा कार्यक्रम बुधवारी (ता. 18) सकाळी ठीक ११ वाजता मौजे कानसळ येथे आयोजित केला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.