झाप गावाला विविध समस्यांनी ग्रासले

अमित गवळे  
रविवार, 30 सप्टेंबर 2018

पाली : पालीपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या झाप गावाकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. पाणी, रस्ते, विज, सांडपाणी आदी विविध समस्यांनी गावकरी हैराण झाले आहेत. आपल्या समस्या मांडण्यासाठी महिलांसह गावकरी शुक्रवारी (ता.28) सायंकाळी तहसील कार्यालयावर धडकले. आणि आपल्या समस्यांचा पाढा वाचून प्रांत अधिकारी व नायब तहसिलदारांना निवेदन दिले.

पाली : पालीपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या झाप गावाकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. पाणी, रस्ते, विज, सांडपाणी आदी विविध समस्यांनी गावकरी हैराण झाले आहेत. आपल्या समस्या मांडण्यासाठी महिलांसह गावकरी शुक्रवारी (ता.28) सायंकाळी तहसील कार्यालयावर धडकले. आणि आपल्या समस्यांचा पाढा वाचून प्रांत अधिकारी व नायब तहसिलदारांना निवेदन दिले.

झाप गावात गावात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. मात्र येथील ग्रामस्तांना पिण्याचे पाणी, रस्ते, सुरळीत विजपुरवठा व सांडपाण्याची व्यवस्था नसल्याने कष्ठप्रद जीवन जगावे लागत आहे. आपल्या तक्रारी घेवून अनेक वेळा शासन व राजकीय नेत्यांकडे खेटा घालूनही कोणतीही ठोस व प्रभावी उपाययोजना केली गेलेली नाही असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. 

ऐंन पावसाळ्यात झापकरांना पाणी टंचाईच्या तिव्र झळा पोहचत आहेत. संतप्त झालेल्या ग्रामस्तांनी अखेर विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी पाली तहसिलकार्यालयावर धडक दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी रविंद्र बोंबले यांच्या उपस्थीतीत पाली सुधागड नायब तहसिलदार वैशाली काकडे यांना झाप ग्रामस्तांनी निवेदन दिले. येथील समस्या मार्गी न लागल्यास आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा ग्रामस्तांनी दिला आहे. याबरोबरच आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकणार असल्याचा निर्धार केला आहे. 

तहसील कार्यालयावर धडक देण्यापूर्वी झाप गावात पुढील दिशा ठरविण्यासंदर्भात महत्वपुर्ण बैठक पार पडली. यावेळी विद्या कुडपणे म्हणाल्या की अनेक वर्षापासून झाप गावाला पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. जिथे प्यायला पाणी नाही तिथे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शुलभ शौचालय उपक्रमाला प्रतिसाद कसा द्यायचा? असा सवाल कुडपने यांनी उपस्थीत केला आहे. निलीमा जंगम यांनी सांगितले की उजाडलेला दिवस पाण्यासाठीच खर्ची झाला तर उदरनिर्वाह रोजगार व अन्य कामे कशी करणार? वृध्द महिला संगिता भालेराव म्हणाल्या की तरुणपणी दुरवरुन पाणी आणता येत होते. आज चालता येत नाही पाण्यासाठी वणवण कुठे भटकणार. दुर्गम गावांना देखील पाणी येते परंतू पालीसारख्या बड्या शहराला लागून असलेल्या झाप गावात पाणी येत नाही ही मोठी शोकांतिका आहे. बैठकीनंतर ग्रामस्तांनी तहसिलकार्यावर धडक देत प्रशासनासमोर आपले गार्‍हाणे मांडले. यावेळी नंदू कुडपणे, नितेश लहाने, भरत जंगम, रामभाउ दळवी, तुकाराम सितापराव, मनोज जंगम, दिपेश लहाने, विनायक जंगम, देवेद्र दळवी, विद्या कुडपणे, निलीमा जंगम, संगिता भालेराव, विजया घाग, सुभद्रा सितापराव, आश्वीनी जंगम आदिंसह झाप ग्रामस्त, तरुण व महिला बहुसंख्येने उपस्थीत होते. 

समस्यां सुटता सुटेना..
ग्रामस्तांनी पाली तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात झाप गावातील पिण्याचे पाणी मे महिण्यापासून कुठल्याही नळ कनेक्शन अथवा सार्वजनिक नळ कनेक्शनला येत नसल्याचे म्हटले आहे. पाली ग्रामपंचायतीसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीत झाप गावाचा समावेष होतो. तरिदेखील झाप गावातील नागरीकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. येथील विहिरी खराब झाल्या आहेत. दुषीत पाण्यामुळे रोगराई व आजारांना सामोरे जावे लागत आहे. पाण्याची पाईपलाईन बदलून नवीन नळकनेक्शन टाकण्यात आले आहेत. मात्र चुकिच्या नळजोडणीमुळे पाणी मुबलक प्रमाणात येत नाही. पाण्याच्या टाकीतील पाणी गावाला पुरत नाही. मात्र पाणीपट्टी व घरपट्टी ग्रामस्तांकडून नियमीत भरली जाते. वारंवार ग्रामपंचायतीत तक्रार करुन देखील कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. प्रशासनाकडे वारंवार अर्ज विनंत्या करुनही ग्रामपंचायतीने झापकरांना समस्यामुक्त करण्याच्या दृष्टीने पाउले उचलली नाहीत. नळजोडणी गटारातून केली आहे. तसेच अनेक ठिकाणी अनधिकृत नळजोडणी करण्यात आली आहे. अनधिकृत नळजोडणी काढून टाकावी अशी मागणी झापकरांनी केली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The zap village is full of various problems