

Students at ZP School No. 1 in Zarye participate in the innovative 'Books Within Books' reading initiative
esakal
राजापूर: सध्याच्या डिजीटल युगामध्ये मुलं अधिकाधिक मोबाईलमध्ये रमल्याचे चित्र ठिकठिकाणी अन् घरोघरी दिसते. त्याचा मुलांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. अशा स्थितीमध्ये ज्ञानाचे विश्व खुले करणार्या पुस्तकांशी मैत्री घडविताना पुस्तक वाचन अन् आकलनातून बालवयातच विद्यार्थ्यांच्या विचारांना नवीन दिशा देण्याच्या उद्देशाने राजापूर तालुक्यातील झर्ये येथील जिल्हा परिषद शाळा नं. 1 येथे ‘पुस्तकांच्या मनातलं’ हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. ‘पुस्तके बोलू लागली आणि मुलं ऐकू लागली ’ या अनोख्या संकल्पनेतून राबविण्यात असलेल्या आणि पुस्तकांनाच बोलते करणार्या या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या भावविश्वाची सफर घडत आहे.