रत्नागिरी जि. प. अध्यक्षपद निवडीचा पेच अखेर सुटला

zilha parishad chairperson elected body declared in ratnagiri
zilha parishad chairperson elected body declared in ratnagiri
Updated on

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेतील अध्यक्ष पदाच्या निवडीचा पेच अखेर सुटला असला तरी ज्येष्ठ सदस्य उदय बने यांची समजूत काढताना पदाधिकारी निवडीत मोठे फेरबदल करण्यात आले. उपाध्यक्षपद उदय बने यांच्याकडे बांधकाम आणि आरोग्य समितीचा पदभार देण्यात आला आहे. प्रथमच उपाध्यक्ष यांच्याकडील कृषी खाते काढून दुसरे खाते देण्यात आले आहे. 

दरम्यान जि. प. अध्यक्ष पदासाठी आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांचे नाव अंतिम करण्यात आले आहे. तर अध्यक्षपदाच्या शर्यतीतील प्रबळ दावेदार उदय बने यांना उपाध्यक्ष पद देण्याचा निर्णय शिवसेना नेत्यांनी घेतला आहे. उपाध्यक्ष पदासह त्यांना बांधकाम आणि आरोग्य समिती हे महत्त्वाचं खातं देण्यात आले आहे. 

सोमवारी सकाळी 11.30 वाजता ही नावे अंतिम करण्यात आली. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसह महिला व बाल कल्याण समिती सभापती पदासाठी भारती  सरवणकर, शिक्षण सभापती पदासाठी चंद्रकांत मणचेकर, समाजकल्याण परशुराम कदम तर कृषी सभापती पदासाठी रेश्मा झगडे यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी अध्यक्ष विक्रांत जाधव, उपाध्यक्ष- उदय बने, चंद्रकांत मणचेकर, परशुराम कदम, रेश्मा झगडे, भारती सरवणकर आदी उपस्थित होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com