

Zilla Parishad construction
sakal
सिंधुदर्गनगरी : जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे जिल्हा नियोजन, जनसुविधा, १५ वा वित्त आयोग यांसह विविध योजनांच्या कामांचा डोंगर साचला आहे; मात्र ही कामे मार्गी लावण्यासाठी आवश्यक अभियंत्यांची पदे रिक्त असल्याने या विभागाला कसरत करावी लागत आहे. अभियंत्यांची ४५ पदे मंजूर असताना केवळ २३ शाखा अभियंता जिल्ह्याचा कारभार हाकत आहेत. परिणामी, विकासकामांच्या गुणवत्तेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.