अर्जेंटिनाच्या खेळाडूंची कोचबरोबरच 'लढत'?

वृत्तसंस्था
Tuesday, 26 June 2018

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील अर्जेंटिनाच्या सलामीच्या सामन्यातील अपयशापासून संघातील खेळाडू आणि मार्गदर्शकात मतभेद सुरू झाले आहेत. खेळाडूंनी थेट हे मार्गदर्शक नकोत अशी मागणी केल्याच्याही बातम्या आहेत. आता अखेरच्या महत्त्वाच्या साखळी लढतीपूर्वी या प्रकारच्या बातम्या टाळण्यासाठी अर्जेंटिना संघव्यवस्थापनाने प्रयत्न सुरू केले. 

मॉस्को, ता. 25 : विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील अर्जेंटिनाच्या सलामीच्या सामन्यातील अपयशापासून संघातील खेळाडू आणि मार्गदर्शकात मतभेद सुरू झाले आहेत. खेळाडूंनी थेट हे मार्गदर्शक नकोत अशी मागणी केल्याच्याही बातम्या आहेत. आता अखेरच्या महत्त्वाच्या साखळी लढतीपूर्वी या प्रकारच्या बातम्या टाळण्यासाठी अर्जेंटिना संघव्यवस्थापनाने प्रयत्न सुरू केले. 
क्रोएशियाविरुद्ध अर्जेंटिनाला स्पर्धा इतिहासातील साठ वर्षांतील सर्वात मोठी हार पत्करावी लागली. त्यामुळे मोहीम जवळपास संपलेल्या अर्जेंटिनास नायजेरियाच्या आईसलॅंडविरुद्धच्या विजयाने संजीवनी दिली, पण त्यापूर्वीच मार्गदर्शक आणि खेळाडूत जाहीरपणे शाब्दीक चकमक झडली आहे. 
मार्गदर्शक जॉर्ज साम्पोली यांच्याबरोबर खेळाडूंचे कोणतेही भांडण नाही. अर्थात एखादी गोष्टी न पटल्यास प्रत्येक खेळाडू स्पष्टपणे आपले मत सांगत आहे. लढत सुरू असताना राखीव खेळाडूही निर्णय प्रक्रियेत सहभागी होतात, असे सांगत जेव्हीअर मॅशेरानो यांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. 
मॅशेरानो हा संघातील सर्वात बुजुर्ग खेळाडू. त्याच्याबद्दल सर्वांनाच आदर आहे. अर्जेंटिना फुटबॉल संघटनेने रविवारी त्याची पत्रकार परिषद घाईघाईने आयोजित केली. त्याने मी आठ राष्ट्रीय मार्गदर्शकांबरोबर खेळलो आहे, यापूर्वीच्या एकाही मार्गदर्शकाने खेळाडूच संघ निवडतात असे कधीही सांगितलेले नाही. सध्याच्या तरुण पिढीबद्दल तसेच आमच्या संघाबाबत अनेक गैरसमज पसरलेले आहेत, असेही तो म्हणाला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Argentina players having fight with coach?