मेस्सी, सुआरेझ, नेमारशिवाय बार्सिलोनाचा दणदणीत विजय 

वृत्तसंस्था
Friday, 23 December 2016

माद्रिद : लियोनेल मेस्सी, लुईस सुआरेझ आणि नेमरा या प्रमुख खेळाडूंच्या गैरहजेरीतही बार्सिलोना संघाने बुधवारी रात्री कोपा डे स्पर्धेच्या बाद फेरीतील सामन्यात दणदणीत विजय मिळविला. त्यांनी दुबळ्या हर्क्‍युलस संघावर 7-0 अशी मात केली. 

प्रशिक्षिक लुईस एन्‍रिक यांनी प्रतिस्पर्ध्यांची ताकद ओळखून आपली ताकद राखून ठेवली. मेस्सी, नेमार, सुआरेझ या प्रमुख खेळाडूंना त्यांनी विश्रांती दिली. अर्थात, त्यानंतरही मिळविलेल्या विजयाने ते समाधानी होते. ते म्हणाले, ''आमचा प्रत्येक खेळाडू भरात आहे. प्रत्येक जण जबाबदारीने खेळतो. आता तर आमची बेंच स्ट्रेंथही भक्कम असल्याची खात्री पटली.'' 

बार्सिलोनाच्या आजच्या विजयात तुर्कीचा आंतरराष्ट्रीय खेळाडू अर्दा तुरन चमकला. त्याने शानदार हॅटट्रिक साधली. ल्युकास डिग्ने याने खाते उघडल्यावर इवान रॅकटिक, रफिन्हा आणि पॅको ऍलकॅसर यांनी बार्सिलोनासाठी अन्य गोल केले. 

अन्य लढतींत रॉड्रिगोने केलेल्या दोन गोलच्या जोरावर व्हॅलेन्सियाने लीगानेस संघावर 2-1 असा विजय मिळविला. या लढतीनंतर व्हॅलेन्सियाने 5-2 असा विजय मिळविला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Barcelona wins despite absence of Leonel Messi