मार्केटिंग नियमांचा इंग्लंडकडून भंग

वृत्तसंस्था
सोमवार, 16 जुलै 2018

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य लढतीच्या वेळी इंग्लंडच्या दोन खेळाडूंनी स्पर्धेच्या मार्केटिंग नियमावलीचा भंग केला. त्याबद्दल इंग्लंड संघास 70 हजार स्विस फ्रॅंक्‍सचा (सुमारे 47 लाख 87 हजार रुपये) दंड करण्यात आला आहे. 
 

मॉस्को- विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य लढतीच्या वेळी इंग्लंडच्या दोन खेळाडूंनी स्पर्धेच्या मार्केटिंग नियमावलीचा भंग केला. त्याबद्दल इंग्लंड संघास 70 हजार स्विस फ्रॅंक्‍सचा (सुमारे 47 लाख 87 हजार रुपये) दंड करण्यात आला आहे. 

क्रोएशियाविरुद्धच्या लढतीच्या वेळी इंग्लंड चाहत्यांनी राजकीय टिप्पणी केली होती. त्याबद्दल इंग्लंड संघटनेस ताकीद देण्यात आली. केवळ काही व्यक्तींनीच या प्रकारची टिप्पणी केली होती. त्यामुळे ताकीद दिल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, इंग्लंडच्या दोन खेळाडूंनी विश्वकरंडक तसेच फिफाचे पुरस्कर्ते असलेल्या कंपनींच्या प्रतिस्पर्धी कंपनीच्या ब्रॅण्डचे मार्केटिंग केले. त्यामुळे त्यांना दंड करण्यात आला. 

इंग्लंडकडून याच नियमाचा स्वीडनविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीच्या वेळीही भंग करण्यात आला होता. त्या वेळीही त्यांना दंड झाला होता; मात्र क्रोएशिया लढतीच्या वेळी खेळाडू जास्त होते, असे फिफाचे म्हणणे आहे. 

Web Title: Breaking of marketing rules from England