बायर्नविरुद्ध आर्सेनलची नाचक्की

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

लंडन - बायर्न म्युनिकने प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील परतीच्या लढतीत आर्सेनलला त्यांच्या घरच्या मैदानावर 5-1 असे पराभूत केले. या लढतीत एकंदरीत 2-10 अशी लज्जास्पद हार पत्करल्यामुळे चाहत्यांनी मार्गदर्शक आर्सेन वेंगर यांची हुर्यो उडवली.

लंडन - बायर्न म्युनिकने प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील परतीच्या लढतीत आर्सेनलला त्यांच्या घरच्या मैदानावर 5-1 असे पराभूत केले. या लढतीत एकंदरीत 2-10 अशी लज्जास्पद हार पत्करल्यामुळे चाहत्यांनी मार्गदर्शक आर्सेन वेंगर यांची हुर्यो उडवली.

थिओ वॉलकॉटने सामन्याच्या सुरवातीस गोल करीत आर्सेनलचे खाते उघडले, त्या वेळी त्यांच्या चाहत्यांना धक्कादायक निकालाची आशा दिसू लागली; पण बायर्नने काही मिनिटांतच आपली ताकद दाखवण्यास सुरवात केली. लॉरेंट कॉस्किएल्नी याच्या चुकीमुळे प्राप्त स्पॉट किकवर रॉबर्ट रेवॉंडोवस्की याने बरोबरी साधून दिली. आर्जेन रॉबेन आणि डग्लस कोस्टा यांनी बायर्नची आघाडी वाढवल्यावर आर्तुरो व्हिडाल याच्या दोन गोलमुळे एकतर्फी विजय निश्‍चित झाला.

सलग सातव्या मोसमात आर्सेनल चॅंपियन्स लीगमध्ये उपउपांत्यपूर्व फेरी पार करू शकली नाही. वेंजर यांना सामन्यानंतर भविष्याबाबत प्रश्‍न विचारण्यात आले. त्यांनी सामन्यातील रेफरींवर टीका करीत आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला. बायर्नने त्यांना सामन्याचा निकाल 10-2 आहे हे लक्षात घ्या, असे उत्तर दिले.

बायर्नचा जम बसल्यावर त्यांची योजनाबद्ध आक्रमणे कशी रोखावीत हेच आर्सेनलला कळत नव्हते. त्यांनी सलग सहाव्यांदा उपांत्यपूर्व फेरी गाठणे अपेक्षितच होते. त्यांनी मोसमाच्या सुरवातीसच चॅंपियन्स लीग विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचे लक्ष्य असल्याचे सांगितले.

रेयाल माद्रिदचा धडाका कायम
रेयाल माद्रिदने नापोलीला परतीच्या लढतीतही 3-1 असेच पराजित केले आणि सलग सातव्यांदा उपांत्यपूर्व फेरी गाठली. नापोलीचा परतीच्या लढतीतील जोरदार प्रतिकार रोखत रेयालने अखेर 6-2 असा एकत्रित विजय मिळविला. रेयालचा धडाका सुरू झाल्यावर आम्हाला संधी नसणार हे ओळखले, असे नापोली खेळाडूंनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: champion league football competition