लिस्टर सिटीची उपांत्यपूर्व फेरीत मुसंडी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 March 2017

लंडन - गतमोसमात प्रीमियर लीग विजेतेपद जिंकून धक्का दिलेल्या लिस्टर सिटीने चॅंपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मुसंडी मारली. त्यांनी पहिल्या टप्प्यातील लढत गमावल्यानंतरही सेविलला हरवण्याचा पराक्रम केला.

नऊ महिन्यांपूर्वी क्‍लॉडिओ रानिएरी यांनी लिस्टरच्या प्रीमियर विजेतेपदात मोलाचा वाटा उचलला होता. पहिल्या टप्प्यातील लढत 1-2 अशी गमावल्यानंतर रानिएरी यांची गच्छंती करण्यात आली होती. परतीची लढत लिस्टरने 2-0 अशी जिंकली. त्यांनी एकत्रित निकालात 3-2 अशी बाजी मारली.

लिस्टरने अखेरच्या 10 मिनिटांत सेविलची पेनल्टी किक अपयशी ठरवत विजय निश्‍चित केला. वेस मॉर्गन व मार्क अलब्रायटन यांनी प्रत्येकी एक गोल करीत लिस्टरला विजयी केले. युव्हेंटिसने परतीची लढत 1-0 अशी जिंकताना एकंदरीत 3-0 असा विजय मिळवला.

लिस्टरची बहारदार कामगिरी
- पहिल्या टप्प्यातील पराभवानंतर विजय मिळवण्याचा पराक्रम करणारा लिस्टर हा प्रीमियर लीगमधील 10 वर्षांतील पहिलाच संघ.
- 2005 मध्ये चेल्सीने बार्सिलोनास हरवल्यानंतर प्रथमच लिस्टरकडून ही कामगिरी.
- चॅंपियन्स लीगमध्ये गोल केलेला वेस मॉर्गन हा जमैकाचा पहिला खेळाडू.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: champion league football competition