esakal | कोपा अमेरिका: अर्जेंटिना, चिली उपांत्य फेरीत
sakal

बोलून बातमी शोधा

कोपा अमेरिका: अर्जेंटिना, चिली उपांत्य फेरीत

कोपा अमेरिका: अर्जेंटिना, चिली उपांत्य फेरीत

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मॅसॅच्युसेट्स - कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिना आणि चिली या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर सहज विजय मिळवीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. अर्जेंटिनाने व्हेनेझुएला 4-1 असा, तर चिलीने मेक्सिकोचा 7-0 असा धुव्वा उडविला. 

अर्जेंटिनासाठी लिओनेल मेस्सीने 60 व्या मिनिटाला नोंदविलेला गोल त्याचा आंतरराष्ट्रीय सामन्यांतील 54 वा गोल ठरला. मेस्सीने अर्जेंटिनाकडून सर्वाधिक गोल करणाऱ्या गॅब्रीएल बटीस्टुआच्या विक्रमाची त्याने बरोबरी केली आहे. मेस्सीने हिग्नेनसाठीही गोल करण्याची संधी निर्माण केली. अर्जेंटिनासाठी हिग्नेनने दोन गोल नोंदविले. पहिल्या सत्रात त्याने एक गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर दुसऱ्या सत्रात 60 व्या मिनिटाला मेस्सीने गोल नोंदविला. अर्जेंटिनासाठी चौथा गोल बदली खेळाडू म्हणून आलेल्या एरिक लामेला याने केला. 

अर्जेंटिनाची उपांत्य फेरीत आता लढत यजनाम अमेरिकेशी होणार आहे. अर्जेंटिना आणि अमेरिका यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना मंगळवारी होस्टन येथे खेळविला जाणार आहे. या स्पर्धेचे 14 वेळा विजेते राहिलेल्या अर्जेंटिनाला पुन्हा एकदा विजेतेपद मिळविण्याची संधी आहे. यापूर्वी अर्जेंटिनाने 1993 मध्ये अर्जेंटिनाने ही स्पर्धा जिंकली होती.

चिलीकडून मेक्सिकोचा 7-0 असा धुव्वा

डुआर्डो वर्गास याने नोंदविलेल्या चार गोलमुळे चिलीने मेक्सिकोवर 7-0 असा एकतर्फी विजय मिळविला. चिलीच्या आघाडीच्या फळीने मेक्सिकोचा बचाव भेदून एकामागून एक गोल नोंदविले. वर्गास अवघ्या 13 मिनिटांत हॅटट्रीक केली. चिलीचा उपांत्य फेरीचा सामना कोलंबियाविरुद्ध बुधवारी होणार आहे.

loading image