"शूट-आउट'च्या अपयशावर इंग्लंडची मात

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 जुलै 2018

इंग्लंड संघाने 21 व्या विश्‍वकरंडक स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठताना केवळ बेल्जियम संघावर नाही, तर "शूट-आउट'च्या अपयशावरही मात केली. नियोजित आणि अतिरिक्त वेळेतील 1-1 अशा बरोबरीनंतर इंग्लंडने "शूट-आउट'मध्ये बेल्जियमचा 4-2 असा पराभव केला.

मॉस्को- इंग्लंड संघाने 21 व्या विश्‍वकरंडक स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठताना केवळ बेल्जियम संघावर नाही, तर "शूट-आउट'च्या अपयशावरही मात केली. नियोजित आणि अतिरिक्त वेळेतील 1-1 अशा बरोबरीनंतर इंग्लंडने "शूट-आउट'मध्ये बेल्जियमचा 4-2 असा पराभव केला.

इंग्लंडला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत "शूट-आउट'चा चक्रव्यूह भेदता आला नव्हता. शूट आउटमध्ये आतापर्यंत आठ लढतीत त्यांना केवळ दोनच विजय मिळविता आले आहेत. हे अपयश धुवून काढताना त्यांनी बेल्जियमवर विजय मिळवला. या विजयाने 1966 नंतर विश्‍वकरंडक जिंकण्याचे इंग्लंडचे स्वप्न अजूनही कायम राहिले. 

इंग्लंडने अपेक्षित सुरवात करताना सामन्याची लय कायम राखली होती. हॅरी केन, रहीम स्टर्लिंग आणि जेस्सी लिनगार्ड यांनी चेंडू चांगला खेळवला. त्यांनी सेट पीसच्या अनेक संधीही कमावल्या. पण, ते कोलंबियावर दडपण आणू शकले नाहीत. दुसरीकडे जेम्स रॉड्रिगेजच्या गैरहजेरीत कोलंबियाचा प्रतिकार तोकडा पडला होता. त्यांनी काही वेळा जरुर प्रतिआक्रमण केले. पण त्यांच्या आक्रमणात ती धार नव्हती. सामन्यातील बहुतेक वेळ खेळाऐवजी एकमेकांना पाडण्यातच जात असल्याचे चित्र होते. त्यामुळे फाऊल्स आणि कार्ड देताना रेफ्रीच अधिक व्यग्र राहिले. या सामन्यात तब्बल 8 यलो कार्डस मिळाली. यातील सहा कार्ड कोलंबियाच्या खेळाडूंना होती. 

सामन्यातील धसमुसळ्या खेळात व्हायचे तेच झाले. इंग्लंडला या वेळी पेनल्टी मिळाली आणि केनने ती साधत इंग्लंडला आघाडीवर नेले. त्यानंतर बेल्जियमने बरोबरीसाठी हरतऱ्हेने प्रयत्न केले. तरी त्यांना यश येत नव्हते. सामन्याचा वेळ निघून जात असतानाच 93व्या मिनिटाला तो क्षण आला आणि मिनाने अचूक हेडर करत गोल साधून बेल्जियमला बरोबरी साधून

त्यानंतर अतिरिक्त वेळेतही दोन्ही संघांकडून विजयासाठी अनेक प्रयत्न झाले. पण शेवटी सामन्याचा निर्णय शूट आउटमध्येच लागला. यात इंग्लंडने बाजी मारली. उरिबेची किक गोलपोस्टच्या बारला धडकली, तर बॅक्काची किक पिकफोर्डने अडवली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: England vs belgium football world cup 2018