क्रोएशियाविरुद्धचा पराभव इंग्लंडसाठी कायमचा सल

fifa football world cup england semifinal match
fifa football world cup england semifinal match

मॉस्को- विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील बेल्जियमविरुद्धची तिसऱ्या क्रमांकाची लढत गमावल्यावरही इंग्लंड खेळाडूंना क्रोएशियाविरुद्धची उपांत्य फेरीची लढतच सलत होती. हा पराभव आम्हाला कायम सलत राहणार, या फॅबियन डेल्फच्या मताशी सर्वच खेळाडू सहमत होते. 

या स्पर्धेत आमची कामगिरी चांगली झाली. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे; पण क्रोएशियाविरुद्धची उपांत्य फेरीतील हार काही महिने नव्हे तर कायमची सलत राहील. अंतिम फेरीत खेळण्याची आपण चांगली संधी गमावली, हे आम्ही आम्हाला सतत बोल लावत राहू, असेही डेल्फ म्हणाला. 

इंग्लंडला या स्पर्धेत सलग दुसऱ्या लढतीत हार पत्करावी लागली. आम्ही चांगले खेळलो; पण संधीचा चांगला फायदा घेतलेल्या संघाकडून हरलो, असे तो म्हणाला. एवढेच नव्हे तर बेल्जियम हा क्रोएशियापेक्षा कितीतरी सरस संघ असल्याचेही त्याने सांगितले. 

इंग्लंड फुटबॉलपटूंसमोरील प्रश्न 
- प्रीमियर लीग फुटबॉल सर्वाधिक किंमत देणारी स्पर्धा; पण त्यात इंग्लंड खेळाडू दुर्लक्षित 
- प्रीमियर लीगमधील अव्वल संघ आपल्या अंतिम संघात क्वचितच इंग्लंड खेळाडूंना निवडतात 
- गतमोसमात इंग्लंड खेळाडूंना निवडण्याचे प्रमाण अवघे 33 टक्के 
- फॅबियन डेल्फ, जॉन स्टोरीज, रहीम स्टर्लिंग, काईल वॉकर हे इंग्लंड संघाचे आधारस्तंभ; पण मॅंचेस्टर सिटी त्यांना क्वचितच अंतिम संघात निवडते 
- स्टर्लिंगचे गेल्या मोसमात 33 गोल; पण वर्ल्डकप सुरू असताना सिटीने त्याचा पर्याय समजला जाणारा रियाद मेहराझ हा करारबद्ध 
- जॉर्डन हेंडरसन हा इंग्लंड, तसेच लिव्हरपूलचा आधारस्तंभ; पण लिव्हरपूलने आता ब्राझीलचा फॅबिन्हो तसेच न्यू गिनीच्या नॅबी केईटाला निवडत हेंडरसनला इशारा दिला 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com