वर्ल्डकप हुकण्याच्या भीतीने धास्तावलो होतो - नेमार

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 मे 2018

रिओ दी जानिरो - सर्वांत महागडा फुटबॉलपटू नेमार विश्‍वकरंडक स्पर्धेपूर्वी तंदुरुस्त होण्यासाठी झगडत आहे. माझ्या पुनरागमनाबाबत, विश्‍वकरंडक खेळण्याबाबत अनेकांना शंका होती; पण माझ्याइतकी भीती कोणालाच वाटत नव्हती, असे नेमारने सांगितले.

फ्रेंच लीगमध्ये मार्सेलीविरुद्ध खेळताना पीएसजीचा अव्वल आक्रमक नेमार जखमी झाला. २५ फेब्रुवारीस त्याला दुखापत झाली. तेव्हापासून तो स्पर्धात्मक लढत खेळलेला नाही. त्याच्या दुखऱ्या उजव्या पायावर मार्चमध्ये शस्त्रक्रिया झाली होती. त्याने केवळ विश्‍वकरंडक पूर्वतयारीवरच लक्ष केंद्रित केले आहे.

ही खूपच खडतर वेळ आहे. हा माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वांत कठीण टप्पा आहे. विश्‍वकरंडक जिंकण्याचे स्वप्न यंदा प्रत्यक्षात येईल असे मला वाटत आहे, असे नेमारने सांगितले. चार वर्षांपूर्वीच्या स्पर्धेतील उपांत्यपूर्व लढतीत त्याला दुखापत झाली. त्यामुळे जर्मनीविरुद्ध खेळू शकला नाही आणि ब्राझीलला जर्मनीविरुद्ध १-७ अशी लाजीरवाणी हार पत्करावी लागली.

देवाच्या कृपेने मला पुन्हा संधी मिळाली आहे. या वेळी माझ्या देशाला जगज्जेता करण्याचा मी कसोशीने प्रयत्न करणार. जगज्जेतेपद जिंकण्याचे स्वप्न लहानपणापासून बाळगले आहे. या वर्षी वर्ल्डकप माझ्या हाती असणार असे मला वाटत आहे.

नेमारची मंगळवारी ब्राझीलच्या संभाव्य संघात निवड करण्यात आली. विश्‍वकरंडकाच्या पूर्वतयारीसाठी ब्राझील क्रोएशियाविरुद्ध ३ जूनला आणि ऑस्ट्रियाविरुद्ध ६ जूनला खेळणार आहे. ब्राझीलची विश्‍वकरंडकातील सलामीची लढत १७ जूनला स्वित्झर्लंडविरुद्ध आहे.

Web Title: Football player Neymar World Cup