esakal | ब्राझील, स्वित्झर्लंडची आगेकूच (मंदार ताम्हाणे)
sakal

बोलून बातमी शोधा

Brazil

बुधवारी एफ ग्रुपमधील झालेल्या सामन्यांमध्ये धक्कादायक निकाल नोंदविले गोले. दक्षिण कोरियाने गतविजेत्या जर्मनीला 2-0 असा पराभव केले. अन् जर्मनीला विश्वकरंडकाबाहेर जावे लागले. तर, दुसऱ्या सामन्यात स्वीडनने मेक्सिकोचा 3-0 ने पराभव करत एफ ग्रुपमध्ये अव्वल स्थान पटकाविले. मेक्सिको दुसऱ्या स्थानावर राहिले. या गटात जर्मनीचा संघ अखेरच्या स्थानावर राहिला. आता बाद फेरीच्या सामन्यांत ब्राझीलचा सामना मेक्सिकोसोबत होणार असून, स्वित्झर्लंडचा सामना स्वीडनसोबत लढत होणार आहे. 

ब्राझील, स्वित्झर्लंडची आगेकूच (मंदार ताम्हाणे)

sakal_logo
By
मंदार ताम्हाणे

ब्राझीलने सर्बियाचा 2-0 ने सहज पराभव करत बाद फेरीत स्थान मिळविले. तसेच ई ग्रुपमध्ये ब्राझीलने अव्वल स्थान मिळविले. या पराभवामुळे सर्बियाला विश्वकरंडकाबाहेर जावे लागले. या गटातून स्वित्झर्लंडनेही आगेकूच केली. 

बाद फेरीत प्रवेश मिळविण्यासाठी ब्राझीलला विजय आवश्यक होता. यामुळे ब्राझीलच्या खेळाडूंनी सुरवातीपासूनच आक्रमक खेळावर जोर देत सामन्यावर वर्चस्व ठेवले. 36 व्या मिनिटाला पावलिनो याने पुतिनोच्या पासवर गोल करत ब्राझीलला आघाडी मिळवून दिली. तर, दुसऱ्या हाफमध्ये डियागो सिल्वा याने 68 व्या मिनिटाला हेडरद्वारे गोल करत ब्राझीलला विजय मिळवून दिला. ब्राझीलचा संघ सलग 13 व्या विश्वकरंडकात साखळी फेरीतून बाद फेरीसाठी पात्र ठरला आहे.

ग्रुप ई मध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात स्वित्झर्लंडला बाद फेरीत जाण्यासाठी फक्त बरोबरी आवश्यक होती. त्यानुसार कोस्टारिकाविरुद्धच्या सामन्यात स्वित्झर्लंडने 2-2 अशी बरोबरी करत बाद फेरी गाठली. या सामन्यात 31 व्या मिनिटाला स्वित्झर्लंडसाठी झमाईनी याने गोल केला. पहिल्या हाफ स्वित्झर्लंड आघाडीवर राहिले. दुसऱ्या हाफ कोस्टारिकाच्या केंडल वॉट्सन याने हेडरद्वारे गोल करत यंदाच्या विश्वकरंडकातील कोस्टारिकाचा पहिला गोल नोंदविला. हा सामना 1-1 असा बरोबरीत सुटेल असे वाटत असतानाच शेवटच्या 5 मिनिटात दोन्ही संघांनी आणखी एक-एक गोल केले. 88 व्या मिनिटाला स्वित्झर्लंडच्या ड्रिमिक याने गोल केला, तर भरपाई वेळेत 90 (+3) कोस्टारिकाच्या ब्रायन रुईझ याने पेनल्टीवर मारलेला चेंडू गोलपोस्टला लागून गोलकिपरच्या पाठिला लागून गोलपोस्टमध्ये गेला. त्यामुळे हा सामना 2-2 असा बरोबरीत सुटला. गेल्या पाच विश्वकरंडकामध्ये स्वित्झर्लंडने चौथ्यांदा विश्वकरंडकाच्या बाद फेरीत प्रवेश केला आहे. 