esakal | स्पेनचा निसटता विजय; इराण पराभूत (मंदार ताम्हाणे)
sakal

बोलून बातमी शोधा

Diego Costa

ब गटामधील दुसऱ्या सामन्यामध्ये पोर्तुगालने मोरोक्कोचा 1-0 असा पराभव केल्याने या ग्रुपमधील स्पेन आणि पोर्तुगाल यांचे गुण समान झाले असून, इराण एक गुणाने मागे आहे. पहिल्या स्थानावर स्पेनचे चार आणि पोर्तुगालचेही 4 गुण आहेत. तर, तिसऱ्या स्थानावरील इराणचे तीन गुण आहेत. मोरक्को दोन्ही सामन्यात पराभूत झाल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे या ग्रुपचे चित्र अखेरच्या साखळी सामन्यांतून स्पष्ट होणार आहे. तसेच पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर कोण यावरून पुढील सामन्यांचे चित्र स्पष्ट होईल. पहिल्या स्थानावर राहण्याचे सर्वांचेच प्रयत्न असणार आहेत.

स्पेनचा निसटता विजय; इराण पराभूत (मंदार ताम्हाणे)

sakal_logo
By
मंदार ताम्हाणे

स्पेनचा डियागो कोस्टाच्या नकळतपणे झालेल्या गोलमुळे स्पेनने इराणचा 1-0 असा पराभव केला. पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. स्पेनचे सामन्यावर वर्चस्व असूनही त्यांना गोल करता आला नाही. इराणच्या खेळाडूंनी बचावात्मक खेळ केल्याने स्पेनच्या खेळाडूंना आक्रमण करता आले नाही. 

दुसऱ्या हाफमध्ये 54 व्या मिनिटाला इराणच्या रामिन रेझाईल डी मधून चेंडू बाहेर मारण्याच्या प्रयत्नात असताना चेंडू थेट डियागो कोस्टाकडे गेला आणि त्याच्या पायाला नकळतपणे चेंडू लागून गोलपोस्टमध्ये गेला. त्यामुळे स्पेनला निर्णायक अशी 1-0 आघाडी मिळाली. या गोलनंतर इराणने पुढेही बचावात्मक खेळ कायम ठेवत आक्रमण करण्यास सुरवात केली. इराणच्या खेळाडूंना याचा फायदा झाला आणि त्यांनी गोल नोंदविला. पण व्हिएआरमध्ये इराणच्या खेळाडूने मारलेला गोल ऑफसाईड असल्याचे स्पष्ट झाले आणि त्यांना गोल नाकारण्यात आला. अखेर इराणला गोल करण्यात अपयश आले आणि स्पेनला 1-0 असा निसटता विजय मिळविता आला.

या विश्वकरंडकात स्पेनच्या डियागो कोस्टाने मारलेला हा तिसरा गोल होता. त्यापूर्वी ख्रिस्तियानो रोनाल्डोने मोरक्कोविरुद्धच्या सामन्यात गोल केल्याने त्याच्या नावावरही चार गोलची नोंद झाली आहे. यंदाच्या विश्वकरंडकात सर्वाधिक गोल रोनाल्डोनेच नोंदविले आहेत. तर, डियागो कोस्टा आणि रशियाचा चेरशेव हे दोन गोलसह दुसऱ्या स्थानावर आहेत. 

ब गटामधील दुसऱ्या सामन्यामध्ये पोर्तुगालने मोरोक्कोचा 1-0 असा पराभव केल्याने या ग्रुपमधील स्पेन आणि पोर्तुगाल यांचे गुण समान झाले असून, इराण एक गुणाने मागे आहे. पहिल्या स्थानावर स्पेनचे चार आणि पोर्तुगालचेही 4 गुण आहेत. तर, तिसऱ्या स्थानावरील इराणचे तीन गुण आहेत. मोरक्को दोन्ही सामन्यात पराभूत झाल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे या ग्रुपचे चित्र अखेरच्या साखळी सामन्यांतून स्पष्ट होणार आहे. तसेच पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर कोण यावरून पुढील सामन्यांचे चित्र स्पष्ट होईल. पहिल्या स्थानावर राहण्याचे सर्वांचेच प्रयत्न असणार आहेत.

विश्वकरंडकात बुधवारी खेळविण्यात आलेले तिन्ही सामन्यांचे निकाल 1-0 असे लागले आहेत. यापूर्वी असे विश्वकरंडकाच्या इतिहासात फक्त दोन वेळा झाले आहे. 25 जून 1982 आणि 23 जून 2010 रोजी एकाच दिवशी तीन सामन्यांचे निकाल 1-0 असे लागले होते. यंदाच्या विश्वकरंडकात आतापर्यंत 20 सामने झाले असून, एकही सामन्यात 0-0 अशी बरोबरी झालेली नाही. प्रत्येक सामन्यात गोल झालेला आहे.