esakal | कवानी हिरो; रोनाल्डो, मेस्सीचा स्वप्नभंग (मंदार ताम्हाणे)
sakal

बोलून बातमी शोधा

Lionel Messi, Christiano Ronaldo

शनिवारी बाद फेरीत झालेल्या दुसऱ्या सामन्यात फ्रान्सने रोमांचक सामन्यात अर्जेंटिनाचा 4-3 असा पराभव केला. जगभरातील फुटबॉलप्रेमींची यामुळे अपेक्षा भंग झाला आहे. उपउपांत्य फेरीत मेस्सी आणि रोनाल्डोची लढत पाहण्याची त्यांची अपेक्षा होती. मात्र, या दोघांचेही संघ पराभूत झाल्याने उपउपांत्यफेरीची लढत फ्रान्स आणि उरुग्वे यांच्यात होईल.

कवानी हिरो; रोनाल्डो, मेस्सीचा स्वप्नभंग (मंदार ताम्हाणे)

sakal_logo
By
मंदार ताम्हाणे

उरुग्वेच्या एडिन्सन कवानीने केलेल्या दोन गोलच्या जोरावर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाला विश्वकरंडकाबाहेर जावे लागले. दक्षिण अमेरिकेतील ब्राझील व अर्जेंटिना या बलाढ्य संघापाठोपाठ नामांकित असा उरुग्वेचा संघाने सध्याचे युरो चॅम्पियन असलेल्या पोर्तुगालचा पराभव करण्याची कामगिरी केली. 

उरुग्वेने सामन्याची सुरवात आक्रमक केली. 7 व्या मिनिटाला लुईस सुआरेझच्या पासवर कवानीने हेडिंगद्वारे गोल करत उरुग्वेला सुरवातीलाच आघाडी मिळवून दिली. रोनाल्डो या सामन्यावर आपल्या खेळाचा प्रभाव पाडू शकला नाही. त्यामुळे पहिल्या हाफमध्ये उरुग्वेचा संघ 1-0 असा आघाडीवर राहिला. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये 55 व्या मिनिटाला पोर्तुगालचा बचाव फळीतील खेळाडू पेपे याने कॉर्नरवर हेडर मारून गोल करत पोर्तुगालला बरोबरी साधून दिली. मात्र, 62 व्या मिनिटाला कवानीने दुसरा करत उरुग्वेला विजयी आघाडी मिळवून दिली. यानंतर पोर्तुगालच्या खेळाडूंनी गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले, पण त्यांना गोल करता आला नाही. उरुग्वेच्या गोलकिपर आणि बचाव फळीने चांगला खेळ केला. या विजयामुळे उरुग्वेचा संघाने उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. रोनाल्डोने आतापर्यंत विश्वकरंडकात खेळलेल्या बाद फेरीच्या सामन्यांमध्ये 514 मिनिटे खेळ केलेला आहे. यामध्ये त्याने एकही मारलेला नाही आणि पासही दिलेला नाही ज्यावर गोल झालेला आहे.  