सायकलवर मेस्सीचा "ऑटोग्राफ' घेण्याची केरळी चाहत्याची इच्छा 

वृत्तसंस्था
Tuesday, 19 June 2018

आवडत्या स्टारचा "ऑटोग्राफ' मिळावा म्हणून क्रीडाप्रेमी जीवाचे रान करतात. केरळचा क्‍लिफीन फ्रान्सिस यापैकीच एक. तो लिओनेल मेस्सीचा प्रचंड "फॅन' आहे. आपल्या सायकलवर मेस्सीचा "ऑटोग्राफ' घेण्याची त्याची इच्छा आहे. त्यासाठी तो रशियाला रवाना झाला आहे. क्‍लिफीन गणिताचा शिक्षक आहे. एका खासगी शाळेत तो नोकरी करतो. त्याने बी. टेक पदवी संपादन केली आहे. तो 28 वर्षांचा असून, कोचीतील चेर्थाला परिसरात राहतो. तो म्हणाला की, "लहानपणापासून मी मेस्सीचा चाहता आहे. विश्‍वकरंडक स्पर्धा पाहण्याचे माझे स्वप्न आहे; पण त्यासाठी खूप खर्च येईल. मी फ्रान्स-डेन्मार्क लढत पाहणार आहे.

आवडत्या स्टारचा "ऑटोग्राफ' मिळावा म्हणून क्रीडाप्रेमी जीवाचे रान करतात. केरळचा क्‍लिफीन फ्रान्सिस यापैकीच एक. तो लिओनेल मेस्सीचा प्रचंड "फॅन' आहे. आपल्या सायकलवर मेस्सीचा "ऑटोग्राफ' घेण्याची त्याची इच्छा आहे. त्यासाठी तो रशियाला रवाना झाला आहे. क्‍लिफीन गणिताचा शिक्षक आहे. एका खासगी शाळेत तो नोकरी करतो. त्याने बी. टेक पदवी संपादन केली आहे. तो 28 वर्षांचा असून, कोचीतील चेर्थाला परिसरात राहतो. तो म्हणाला की, "लहानपणापासून मी मेस्सीचा चाहता आहे. विश्‍वकरंडक स्पर्धा पाहण्याचे माझे स्वप्न आहे; पण त्यासाठी खूप खर्च येईल. मी फ्रान्स-डेन्मार्क लढत पाहणार आहे. रशियात काही दिवस राहिल्यानंतर मी सायकलवरूनच परत येईन.' 

क्‍लिफीन आधी दुबईला विमानाने गेला. तेथे त्याने सायकल खरेदी केली. अमिरातीहून जहाजाने तो इराणला दाखल झाला. जॉर्जियामार्गे रशियात सायकलवरून जाण्याचे त्याचे नियोजन होते; पण त्याला "व्हिसा' मिळाला नाही. त्यामुळे तो अझरबैजानमार्गे गेला. मॉस्कोला जाण्यासाठी त्याला सुमारे सहाशे किलोमीटर सायकलिंग करावे लागेल. त्यासाठी एक आठवडा लागेल. या प्रवासाविषयी तो म्हणाला की, "हा अनुभव अनोखा आहे. पैसे वाचविण्यासाठी मी "टेंट'मध्ये राहिलो. आतापर्यंत प्रवास केलेल्या देशांतील नागरिक आणि अधिकाऱ्यांनी मी भारतीय असल्याचे समजल्यावर चांगली वागणूक दिली. अझरबैजानमध्ये मला मल्याळी बांधव भेटले. त्यांनी मला भावासारखी वागणूक दिली. याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meet Clifin Francis, The Man From Kerala Who Cycled All The Way To Russia To Watch The FIFA World Cup