केरळमध्ये मेस्सीच्या चाहत्याने केली आत्महत्या

वृत्तसंस्था
शनिवार, 23 जून 2018

कोट्टायम : ''माझ्या आयुष्यात जगण्यासारखे आता काहीच राहिलेले नसून मी आत्महत्या करत आहे" मल्याळी भाषेतील या आशयाची चिठ्ठी दिनू अॅलेक्स या तरुणाच्या खोलीत सापडली आहे. 

मीनाचिल नदीच्या किनाऱ्यावरील अरुमानूर या छोट्या गावातील मेस्सीचा चाहता असलेला 30 वर्षीय दिनू अर्जेंटिनाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर बेपत्ता आहे. पोलिस आणि अग्निशामक दलाचे शोध पथक यांनी मीनाचिल नदीकाठी शोध मोहिम सुरु केली आहे. मात्र सतत पडणाऱ्या पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढून शोध मोहिमेत अडथळा येत आहे. दिनूला त्याच्या आई वडिलांनी मध्यरात्री फुटबॉलचा सामना बघताना पाहिले होते. 

दिनूचा नातेवाईक जॉईस कोट्टाहीलनुसार दिनू हा अत्यंत शांत स्वभावाचा होता. तो फुटबॉलचे सर्व सामने पाहायचा आणि तो मेस्सीचा मोठा चाहता होता. दिनूच्या एका वहीत त्याने लिहिले होते, ''मेस्सी माझे आयुष्य तुझ्यासाठी आहे, तुला विश्वकरंडक उंचावताना पाहण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे. माझा संघ विश्वकरंडकाचा प्रवास सुरु करत असून माझे आयुष्य मी त्यासाठी अर्पण करेल. 

कोट्टीयाममधील खाजगी कंपनीत अकांउटंट म्हणून काम करणार्या दिनूने सामन्याआधी अर्जेंटिनाची नवीन जर्सी विकत घेतली होती व सर्व सहकाऱ्यांना सांगितले होते की अर्जेंटिना आज जिंकणार असून माझा हिरो मेस्सी गोल करणार आहे.   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Messi fan missing after Argentina loss