मॅंचेस्टर सिटी विक्रमी शतकाकडे

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 May 2018

मॅंचेस्टर - मॅंचेस्टर सिटीने प्रीमियर लीग फुटबॉलमधील धडाका कायम ठेवताना ब्रायटनचा ३-१ असा पराभव केला. सिटीने या विजयासह स्पर्धेतील सर्वाधिक गुणांचा विक्रम केला, तसेच स्पर्धेत सर्वाधिक गोलही केले आहेत, तसेच सर्वाधिक विजयाच्या विक्रमाची बरोबरीही केली आहे.

मॅंचेस्टर - मॅंचेस्टर सिटीने प्रीमियर लीग फुटबॉलमधील धडाका कायम ठेवताना ब्रायटनचा ३-१ असा पराभव केला. सिटीने या विजयासह स्पर्धेतील सर्वाधिक गुणांचा विक्रम केला, तसेच स्पर्धेत सर्वाधिक गोलही केले आहेत, तसेच सर्वाधिक विजयाच्या विक्रमाची बरोबरीही केली आहे.

मॅंचेस्टर सिटीचे आता ९७ गुण झाले असून, त्यांनी चेल्सीचा (२००४-०५) सर्वाधिक ९५ गुणांचा विक्रम मोडीत काढला. आता प्रीमियर लीगमधील अखेरची लढत जिंकत गुणांचे ऐतिहासिक शतक गाठण्याची सिटीला संधी आहे. ‘तब्बल ९७ गुण, भरपूर गोल, भरपूर विजय, या मोसमात आम्ही खूप काही साधले आहे. आता या स्पर्धेत गुणांचे शतक करण्याचे लक्ष्य आहे,’ असे सिटीचे मार्गदर्शक पेप गॉरडिलो यांनी सांगितले. 

सिटीने या मोसमात १०५ गोल करीत चेल्सीने २००९-१० च्या मोसमात नोंदवलेला १०३ गोलचा विक्रम मोडला. त्यांचा हा ३१ वा विजय आहे. एकाच मोसमात सर्वाधिक ३१ विजय नोंदवत टॉटनहॅमच्या १९६०-६१ मधील कामगिरीशी त्यांनी बरोबरी साधली. 

सिटीने या मोसमातील विजयाची सुरवात ब्रायटनला हरवून केली होती. आता त्यांच्याविरुद्ध परतीच्या लढतीत विक्रमांना गवसणी घातली आहे. ‘‘सर्वोत्तम संघ विजेतेपदानुसार ठरतो. आम्ही सर्वांपेक्षा सरस आहोत, असेही म्हणणेही योग्य नाही. या मोसमात आम्ही सरस ठरलो आहोत, इतिहास केला आहे, याची दखल घेतलीच जाईल,’’ असे त्यांनी सांगितले.

बहरातील सिटी
 १९७८-७९ मोसमात लिव्हरपूलने दबदबा राखला होता, पण त्यावेळी विजयासाठी दोन गुण होते. आता त्यांच्या विजयास तीन गुण दिले, तर लिव्हरपूलचे त्यावेळचे गुण होतात ९८.
 प्रीमियर लीगमध्ये बढती मिळालेल्या संघांविरुद्धच्या सलग आठ लढतींत सिटीने गोल स्वीकारला आहे.
 सॅन याची गोल सहायकाची हॅटट्रिक ही कामगिरी यंदा करणारा सिटीचा तो तिसरा खेळाडू.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Premier League Football Competition