रोनाल्डो अपयशी, रेयालची मात्र सरशी

वृत्तसंस्था
Friday, 27 April 2018

म्युनिक  - बायर्न म्युनिकने ख्रिस्तियानो रोनाल्डोची कोंडी केली, त्यावर मात करीत गोल करण्याचा रोनाल्डोचा ‘हॅंड ऑफ गॉड’ प्रयत्नही अपयशी ठरला, पण बायर्नच्या सदोष नेमबाजीमुळे रेयाल माद्रिदने चॅंपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य लढतीच्या पहिल्या टप्प्यातील लढतीत २-१ असा विजय मिळविला. 

म्युनिक  - बायर्न म्युनिकने ख्रिस्तियानो रोनाल्डोची कोंडी केली, त्यावर मात करीत गोल करण्याचा रोनाल्डोचा ‘हॅंड ऑफ गॉड’ प्रयत्नही अपयशी ठरला, पण बायर्नच्या सदोष नेमबाजीमुळे रेयाल माद्रिदने चॅंपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य लढतीच्या पहिल्या टप्प्यातील लढतीत २-१ असा विजय मिळविला. 

बायर्न - रेयाल लढतीत लक्ष रोनाल्डोवर होते. रोनाल्डोला चेंडूवर क्वचितच ताबा घेता येत होता. गोलक्षेत्रात तर तो तीनदाच चेंडूला स्पर्श करू शकला. अखेर रोनाल्डोने ‘हॅंड ऑफ गॉड’ क्‍लृप्ती वापरली. त्याने सामन्यातील ७१ व्या मिनिटास चेंडूवर कमालीचा ताबा घेत तो जाळ्यात धाडला. मात्र रेफरी बियॉन कुईपर्स यांनी रोनाल्डोची क्‍लृप्ती ओळखली होती. त्यांनी रोनाल्डोने फाऊल केल्याचे सांगत गोल नाकारला. त्या वेळी त्याने हाताने चेंडूवर नियंत्रण मिळवल्याचे टीव्ही रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसले होते. अखेर संपूर्ण सामन्यात रोनाल्डोला एकही गोल करता आला नाही. त्याचबरोबर या मोसमातील सर्वाधिक गोलच्या क्रमवारी मोहंमद सालाहला रोनाल्डो मागे टाकू शकला नाही. सालाहने या मोसमात ४३ गोल केले आहेत, तर रोनाल्डोने ४२. 

विजेतेपदाची हॅटट्रिक खुणावत असलेल्या रेयालचा बचाव कमकुवत होता, पण आक्रमणात ते वरचढ होते. त्याचवेळी बायर्नने पण बचाव आणि आक्रमणात अनेक चुका करीत विजयाची संधी दवडली. रोनाल्डोची सलग ११ चॅंपियन्स लीगमध्ये गोल करण्याची मालिका खंडित झाली, पण मार्सेलो आणि बदली खेळाडू मार्को ॲसेनसिओ यांनी १३ मिनिटांच्या अंतराने केलेल्या गोलने रेयालला विजयी केले. जोशुओ किमिच याने २८ व्या मिनिटास केलेला गोल सोडल्यास बायर्नला काहीच साधले नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ronaldo failed in Champions League football tournament