रोनाल्डोचा खेळ जुन्या वाइनसारखा 

वृत्तसंस्था
Friday, 22 June 2018

ख्रिस्ताओना रोनाल्डोचा खेळ सध्या जुन्या झालेल्या वाइनसारखा होतोय. जुनी झालेली वाइन जशी चवदार लागते, तसा वाढत्या वयात रोनाल्डोचा खेळ अधिक बहरतोय. तो गेल्या चार पाच वर्षांसारखा खेळत नाहीये. आपल्याकडून काय अपेक्षा आहेत आणि काय केले पाहिजे हे त्याला चांगले माहीत आहे. त्याने आताच स्पर्धा आपल्याभोवती फिरवली आहे. - फर्नांडो सॅंटोस, पोर्तुगालचे प्रशिक्षक 

दोन विजय हा अपघात नाही 
आम्ही दोन विजय हे अपघाताने मिळविलेले नाहीत. आमच्याकडे भक्कम खेळ करणारे खेळाडू आहेत. स्पर्धेपूर्वी होणाऱ्या टीकेने ते प्रेरित झाले आहेत. आम्हाला जिंकायचेच होते. त्यामुळेच प्रत्येक खेळाडू हा जिंकण्याच्याच इराद्याने खेळला. या पुढील सामन्यात आम्ही असाच खेळ करू. पण, सध्या पुढील सामन्यापूर्वी खेळाडू जल्लोषाच्या "मूड'मध्ये आहेत. असे मत  रशियाचे प्रशिक्षक स्टानिस्लाव चेरेशेसोव यांनी व्यक्त केले आहे. 

आमच्यावर उगाच टीका होत आहे. जगातून अजून वर्णभेद संपत नाही याचा खेद वाटतो. आम्ही आफ्रिकन आहोत आणि याचा आम्हाला अभिमान वाटतो. 2002 मध्ये फ्रान्सवर आणि आता पोलंडवर विजय मिळवून आम्ही आमची ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे आम्ही कौतुकास पात्रच आहोत. - एलियू सिसे, सेनेगलचे प्रशिक्षक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ronaldo's game is like old wine