esakal | इंग्लंडचे युवक फुटबॉलचे जगज्जेते
sakal

बोलून बातमी शोधा

इंग्लंडचे युवक फुटबॉलचे जगज्जेते

इंग्लंडचे युवक फुटबॉलचे जगज्जेते

sakal_logo
By
पीटीआय

सुवॉन (दक्षिण कोरिया) - इंग्लंडने व्हेनेझुएलास पराजित करत विश्‍वकरंडक युवा फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. फुटबॉल जगतातील सर्वांत प्रतिष्ठेच्या व्यावसायिक प्रीमियर लीगचे संयोजक असलेल्या इंग्लंडने १९६६ नंतर प्रथमच फुटबॉलचे जागतिक विजेतेपद पटकावले.

डॉमिनिक कॅल्वर्ट लेविन याच्या गोलमुळे या लढतीत इंग्लंडने बाजी मारली. हा गोल ३५ व्या मिनिटास झाला होता. इंग्लंडचा गोलरक्षक फ्रेडी वूडमन याने ॲदाल्बेर्टो पेनारॅंदा याने ७४ व्या मिनिटास घेतलेली पेनल्टी किक रोखत इंग्लंडचा विजय सुकर केला. या लढतीत व्हेनेझुएलाचा खेळ जास्त आकर्षक होता; पण भक्कम बचाव आणि मोक्‍याच्या वेळी प्रतिआक्रमण करत इंग्लंडने बाजी मारली. 

तब्बल ५१ वर्षांपूर्वी इंग्लंडने विश्‍वकरंडक जिंकला होता. त्यानंतर प्रथमच त्यांनी विश्‍वकरंडकात अंतिम फेरी गाठली होती आणि ही मोहीम त्यांनी यशस्वी केली. इंग्लंडच्या या मोहिमेत डॉमिनिक सोळंकी याने सोनेरी झळाळी दिली. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक आठ गोल करत गोल्डन बूट पुरस्कार जिंकला, तर इंग्लंडचाच गोलरक्षक वूडमन सर्वोत्तम गोलरक्षक ठरला. गोल्डन बूट जिंकत सोळंकी दिएगो मॅराडोना, लिओनेल मेस्सी, लुईस फिगो, पॉल ड्रोग्बा आणि सर्गीओ ॲग्यूएरा यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.