इंग्लंडची नेदरलॅंड्‌सवर मात

वृत्तसंस्था
Sunday, 25 March 2018

ॲमस्टरडॅम (नेदरलॅंड्‌स) - इंग्लंडने मित्रत्वाच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यात नेदरलॅंड्‌सवर २२ वर्षांनी मात केली. जेसी लिंगार्डने केलेला पहिला आंतरराष्ट्रीय गोल निर्णायक ठरला.

नेदरलॅंड्‌सचा संघ विश्वकरंडक स्पर्धेला पात्र ठरलेला नाही. इंग्लंडने यापूर्वी १९९६च्या युरो स्पर्धेत वेंबली स्टेडियमवर नेदरलॅंड्‌सला ४-१ असे हरविले होते. विद्यमान मार्गदर्शक गॅरेथ साऊथगेट तेव्हा खेळाडू म्हणून संघात होते. इंग्लंड यानंतर मायदेशात इटलीविरुद्ध सामना खेळणार आहे.

फ्रान्स पराभूत
पॅरिस - फ्रान्सला दोन गोलांच्या आघाडीनंतरही कोलंबियाविरुद्ध २-३ असे पराभूत व्हावे लागले. ऑलिव्हर जिरूड व थॉमस लेमार यांनी फ्रान्सला पकड मिळवून दिली होती; पण त्यानंतर लुईस मुरीयल, रॅडामेल फाल्काओ व जुआन क्विंटेरो यांनी कोलंबियाचा फ्रान्सवरील पहिला विजय साकार केला.

इतर निकाल
मोरोक्को विवि सर्बिया २-१
ट्युनिशिया विवि इराण १-०

भरपाई वेळेत रोनाल्डोचा धडाका
झुरीच (स्वित्झर्लंड) ः पोर्तुगालने ईजिप्तवर २-१ अशी मात केली. भरपाई वेळेत कर्णधार ख्रिस्तीयानो रोनाल्डो याने दोन गोल केले. महंमद सालाह याच्या गोलमुळे ईजिप्तने आघाडी घेतली होती. रोनाल्डोने ९२व्या मिनिटाला रिकार्डो क्‍युआरेस्मा याच्या क्रॉस पासवर अचूक हेडिंग केले. त्यानंतर अंतिम क्षणी त्याने रिकार्डोच्याच चालीचे हेडिंगवर सोने केले. व्हिडिओ ॲसिस्टंट रेफरी (व्हीएआर) पद्धतीनुसार या गोलचा निर्णय झाला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news England beat Netherlands football