एफसी पुणे सिटीकडून एमिलिआनो करारबद्ध 

पीटीआय
Wednesday, 12 July 2017

पुणे - एफसी पुणे सिटी संघाने आगामी मोसमासाठी एमिलिआनो अल्फारो या पहिल्या परदेशी खेळाडूला करारबद्ध केले आहे. 

गतवर्षी नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीचे प्रतिनिधित्व केलेल्या एमिलिआनो अल्फारोने तेरा सामन्यात पाच गोल गोल केले होते.  एमिलिआनो अल्फारोने २००६ मध्ये उरूग्वे येथील आघाडीच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रिमियम डिव्हिजन क्‍लब असलेल्या लिव्हरूपूल एफसी कडून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरवात केली. त्यानंतर लागोपाठ दोन वर्षे या क्‍लबकडून सर्वाधिक गोल करण्याचा मान मिळवला. २०११ मध्ये अल्फारो इटली विरुद्ध मैत्रीपूर्ण लढतीसाठी राष्ट्रीय संघात सहभागी झाला होता. 

त्याचे खेळातील कौशल्य पाहून त्याला इटालियन क्‍लब लाझियो संघाने आपल्या संघात दाखल केले आणि या संघाकडून तीन वर्षे खेळला. त्यानंतर २०१४-१५ मध्ये लिव्हरपूल एफसी संघाला सेगूंडा डिव्हिजनमध्ये विजेतेपद मिळवून देण्यात त्याचा प्रमुख वाटा होता. 

एफसी पुणे सिटीचे मुख्य प्रशिक्षक अँटोनिओ हबास म्हणाले की, अल्फारो  हा सर्वांगीण कौशल्य असलेला खेळाडू असून प्रतिस्पर्ध्यांच्या क्षेत्रात आक्रमक चाली रचण्याचे आणि त्यासाठी डावपेच आखण्याचे त्याचे कौशल्य वादादीत आहे संघाला गरज भासेल तेव्हा तो बचावपटूंची भूमिका उत्तम बजावू शकतो. त्यामुळेच तो एफसी पुणे सिटीसाठी ती जमेची बाजू ठणार आहे. 

एमिलिआनो अल्फारोच्या संघातील समावेशामुळे एफसी पुणे सिटीचा निश्‍चितच फायदा होईल, असा आत्मविश्वास एफसी पुणे सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल यांनी व्यक्त केला. अल्फारो हा प्रतिस्पर्ध्याच्या गोलजाळ्यापर्यंत धडक मारण्याचे कौशल्य माहिती असलेला आघाडीवीर आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news football