मेस्सी, रोनाल्डोसह बुफॉन शर्यतीत

पीटीआय
Thursday, 17 August 2017

लंडन - ‘युरोपातील सर्वोत्तम फुटबॉलपटू’ या पुरस्कारासाठी नामांकने जाहीर झाली आहेत. बार्सिलोनाचा लिओनेल मेस्सी, रेयाल माद्रिदचा ख्रिस्तीयानो रोनाल्डो यांच्यासह युव्हेंट्‌सचा गोलरक्षक जियानलुईजी बुफॉन असे तीन मातब्बर या शर्यतीत असतील.

लंडन - ‘युरोपातील सर्वोत्तम फुटबॉलपटू’ या पुरस्कारासाठी नामांकने जाहीर झाली आहेत. बार्सिलोनाचा लिओनेल मेस्सी, रेयाल माद्रिदचा ख्रिस्तीयानो रोनाल्डो यांच्यासह युव्हेंट्‌सचा गोलरक्षक जियानलुईजी बुफॉन असे तीन मातब्बर या शर्यतीत असतील.

‘यूएफा’ या युरोपातील शिखर संघटनेकडून हा पुरस्कार दिला जातो. २०१६-१७ मधील कामगिरी त्यासाठी विचारात घेतली जाते. मेस्सी आणि रोनाल्डोची कामगिरी प्रभावी असली तरी बुफॉनसुद्धा गेल्या मोसमात लक्षवेधी ठरला. इटालियन साखळीत (सेरी ए) युव्हेंट्‌सने सलग सहावे विजेतेपद मिळविले. याशिवाय या संघाने इटालियन सुपर कप सलग तिसऱ्यांदा जिंकला. चॅंपियन्स लीगच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या युव्हेंट्‌स संघाच्या वाटचालीत ३९ वर्षांच्या बुफॉनने भरीव योगदान दिले. कार्डीफमधील अंतिम सामन्यात रोनाल्डोच्या रेयाल माद्रिदकडून युव्हेंट्‌सचा १-४ असा पराभव झाला. रोनाल्डोच्या बहारदार कामगिरीच्या जोरावर रेयाल माद्रिदने सलग दुसऱ्यांदा चॅंपियन्स लीग जेतेपद पटकावले. रोनाल्डोने स्पर्धेत सर्वाधिक १२ गोल केले. मेस्सीने बार्सिलोनाकडून स्पॅनिश किंग्ज कप जिंकला. ला लिगा अर्थात स्पॅनिश अव्वल साखळीत त्याने सर्वाधिक ३७ गोल केले.

महिला विभागातील पुरस्कारासाठी वुल्फ्सबर्गची स्ट्रायकर पेर्नील हार्डर, ऑलिंपिक लिआँच्या मध्य फळीतील डेझेसेनीफर मॅरोझ्सान आणि बार्सिलोनाची विंगर लैकी मार्टेन्स यांना नामांकन मिळाले. लैकीने या महिन्याच्या प्रारंभी पार पडलेल्या महिला युरो स्पर्धेत नेदरलॅंड्‌सला प्रथमच विजेतेपद मिळवून देण्यात बहुमोल कामगिरी बजावली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news football