वर्ल्डकप फुटबॉल : भारताच्या गटात अमेरिका, कोलंबिया आणि घाना 

वृत्तसंस्था
Saturday, 8 July 2017

मुंबई : भारतीय कुमार संघ विश्वकरंडक सतरा वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेतील आपली मोहीम अमेरिकेविरुद्धच्या लढतीने सुरवात करील. दिल्लीतील या लढतीपूर्वी कोलंबिया आणि घाना ही स्पर्धेतील सलामीची लढत राजधानीतच होईल. त्याचवेळी नवी मुंबईतील लढतींना न्यूझीलंड-तुर्की सामन्याने सुरवात होईल. 

मुंबई : भारतीय कुमार संघ विश्वकरंडक सतरा वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेतील आपली मोहीम अमेरिकेविरुद्धच्या लढतीने सुरवात करील. दिल्लीतील या लढतीपूर्वी कोलंबिया आणि घाना ही स्पर्धेतील सलामीची लढत राजधानीतच होईल. त्याचवेळी नवी मुंबईतील लढतींना न्यूझीलंड-तुर्की सामन्याने सुरवात होईल. 

भारतात प्रथमच होत असलेल्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा ड्रॉ केवळ खेळालाच महत्त्व देत झालेल्या कार्यक्रमात काढण्यात आला. केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल, फिफा परिषद सदस्य सुनील गुलाटी तसेच भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांची माफक भाषणे सोडल्यास सर्व कार्यक्रमात केवळ ड्रॉलाच पूर्णपणे महत्त्व देण्यात आले होते.

सर्वांचे लक्ष लागलेल्या भारताच्या अ गटात या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठलेले कोलंबिया तसेच घाना पंधराव्यांदा पात्र ठरलेले अमेरिका यांचा समावेश आहे. 

नवी मुंबईत ब गटाच्या लढती होतील. त्यात गतस्पर्धेचे उपविजेते माली, जागतिक फुटबॉलमध्ये प्रगती करीत असलेले पॅराग्वे, न्यूझीलंड तसेच टर्की आहेत, तर गोव्याला वरिष्ठ गटातील जगज्जेता जर्मनी, गोव्यातच आशियाई उपविजेतेपद जिंकलेले इराण, कोस्टा रिका तसेच गिनिया यांचा खेळ पाहण्याची संधी लाभेल. 

गटवारी (कंसातील शहरे गटाचे प्रमुख यजमान) - अ गट (प्रमुख लढती दिल्ली) ः भारत, अमेरिका, कोलंबिया, घाना. ब गट (नवी मुंबई) ः पॅराग्वे, माली, न्यूझीलंड, तुर्की. क गट (मडगाव) ः इराण, गिनिया, जर्मनी, कोस्टा रिका. ड गट (कोची) ः उत्तर कोरिया, निजर, ब्राझील, स्पेन. इ गट (गुवाहाटी) ः होंदुरास, जपान, न्यू कॅलोडोनिया, फ्रान्स. फ गट (कोलकता) ः इराक, मेक्‍सीको, चिली, इंग्लंड.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news Football FIFA world cup India marathi news marathi website