जमशेदपूरला हरवून पुणे सिटीची आघाडी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 January 2018

पुणे - इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) चौथ्या मोसमात एफसी पुणे सिटीने जमशेदपूरवरील २-१ अशा विजयासह गुणतक्‍त्यात आघाडी पटकावली. मध्यंतराची एका गोलची पिछाडी भरून काढताना पुण्याने उत्तरार्धात चार मिनिटांच्या अंतराने दोन गोल करत विजय खेचून आणला. गुरतेज सिंग आणि एमिलीयानो अल्फारो यांनी हे गोल केले.

पुण्याचे मुख्य प्रशिक्षक रॅंको पोपोविच चार सामन्यांच्या निलंबनानंतर परतले. त्यांच्यासह ६६१२ चाहत्यांसाठी हा निकाल आनंददायक ठरला. पुण्याने १२ सामन्यांत सातवा विजय मिळविला. एक बरोबरी व चार पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. पुण्याचे सर्वाधिक २२ गुण झाले. चेन्नईयीन एफसी (२०) व बंगळूरएफसी (२१) यांना मागे टाकत पुण्याने दोन क्रमांक प्रगती केली. बंगळूरव चेन्नईचे प्रत्येकी ११ सामने झाले आहेत. जमशेदपूरला १२ सामन्यांत चौथा पराभव पत्करावा लागला. चार विजय व चार बरोबरी अशा कामगिरीसह १६ गुण मिळवून त्यांचे पाचवे स्थान कायम राहिले. वेलिंग्टन प्रिओरीने जमशेदपूरचे खाते उघडले होते.

६२व्या मिनिटाला पुण्याला उजवीकडे कॉर्नर मिळाला. मार्सेलिनीयोने नेटसमोर मारलेल्या चेंडूवर गुरतेजने सरस उडी घेत हेडिंग केले. चेंडू जमशमदेपूरचा गोलरक्षक सुब्रत पॉल याच्या थोड्या बाजूने वरून नेटमध्ये गेला. ६६व्या मिनिटाला अल्फारोने पाच सामन्यांत पहिला गोल केला. मार्सेलिनीयोने ही चाल रचली. सामन्याची सुरवात सकारात्मक झाली. चौथ्याच मिनिटाला फारुख चौधरीने अवघड कोनातून फटका मारत पुण्याचा गोलरक्षक विशाल कैथ याची कसोटी पाहिली. 

निकाल - एफसी पुणे सिटी - २ (गुरतेज सिंग ६२, एमिलीयानो अल्फारो ६६) विजयी विरुद्ध जमशेदपूर एफसी - १ (वेलिंग्टन प्रिओरी २९)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news indian super league football competition