मेस्सीची कमाई मिनिटाला ‘फक्त’ १३३ पौंड

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 December 2017

माद्रिद - अर्जेंटिनाचा स्टार आक्रमक लिओनेल मेस्सी याच्याबरोबरील करार बार्सिलोनाने २०२१ पर्यंत वाढवला आहे. त्याच्या कराराचे तपशील आता उघड होत आहेत, त्यानुसार त्याला एका मिनिटाला १३३ पौंड लाभणार आहेत.

माद्रिद - अर्जेंटिनाचा स्टार आक्रमक लिओनेल मेस्सी याच्याबरोबरील करार बार्सिलोनाने २०२१ पर्यंत वाढवला आहे. त्याच्या कराराचे तपशील आता उघड होत आहेत, त्यानुसार त्याला एका मिनिटाला १३३ पौंड लाभणार आहेत.

मेस्सीला नव्या करारानुसार वर्षाला ७ कोटी पौंड मिळतील. याचाच अर्थ आठवड्याला १३ लाख ५० हजार पौंड. त्याचबरोबर त्याला करचुकवेगिरी प्रकरणातील नुकसानभरपाई म्हणून १० कोटी पौंडही देण्यात आल्याचे वृत्त आहे. मेस्सीचा एकंदरीत करार ४५ कोटी पौंडचा आहे. फूटी मेमेस यांनी मेस्सीच्या कराराची माहिती ट्विट केली आहे. त्यानुसार त्याला सेकंदाला २.२ पौंड, मिनिटाला १३३ पौंड, तासाला ८ हजार ३५ पौंड, दिवसाला १ लाख ९२ हजार ८५७ पौंड, आठवड्याला १३ लाख ५० हजार पौंड, महिन्याला ५८ लाख पौंड, तर वर्षाला ७ कोटी पौंड मिळतील. फुटबॉल अभ्यासकांनुसार मेस्सीचा हा नवा करार त्याला ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या ७० टक्के जास्त सरस आहे. मेस्सीला केवळ कार्लोस तेवेझ याचे आव्हान आहे. चीन साखळीत खेळत असल्यामुळे तेवेझची कमाई ६ कोटी ४० लाख डॉलर आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news lionel messi 133 pound income in one minit