मॅजिकल मेस्सी

मॅजिकल मेस्सी

बार्सिलोना - लिओनेल मेस्सीने बहारदार दोन गोल करतानाच अन्य एका गोलात मोलाची भूमिका बजावली; त्यामुळे बार्सिलोनाने चॅंपियन्स लीगच्या उपउपांत्यपूर्व फेरीतील चेल्सीविरुद्धच्या लढतीच्या दुसऱ्या टप्प्याच्या सामन्यात ३-० असा विजय मिळविला. बार्सिलोनाने ही लढत ४-१ अशी सहज जिंकत आगेकूच केली. 

बार्सिलोनाने चेल्सीच्या होम लढतीत गोल करीत वर्चस्व मिळवले होते; त्यामुळे चेल्सीला किमान एक गोल करण्याचे दडपण होते. त्यातच मेस्सीने १२८ व्या सेकंदालाच गोल करीत चेल्सीवर दडपण वाढवले. त्याने त्यानंतर मध्यरेषेजवळ चेंडूचा ताबा घेतला. तिघांना चकवले आणि ओसुमेन देम्बेले याच्याकडे अचूक पास दिला आणि बार्सिलोनाची आघाडी वाढली. चेल्सीचा जोरदार प्रतिकार मेस्सीच्या चॅंपियन्स लीगमधील शंभराव्या गोलने निष्प्रभच केला. 

मेस्सी ही तर आमची ताकद आहे. त्याची प्रत्येक चाल धोकादायक ठरू शकते. तो आमच्या आक्रमणाचा आधारस्तंभच आहे. त्याच्या एका टचने चालीचा प्रभाव वाढतो, असे बार्सिलोनाचे मार्गदर्शक ए्रनेस्टो वॅलवेर्दे यांनी सांगितले. मेस्सीचा पहिला गोल पाहून मीच चकित झालो. त्याला गोलची खूपच कमी संधी होती; पण त्याने मला पाय जवळ आणण्याचीही संधी दिली नाही. मेस्सीविरुद्ध मी अनेकदा खेळलो आहे; पण तो अनेकदा माफक चुकीचीही शिक्षा देतो, आम्ही चांगले खेळलो; पण चार चुकांनी स्पर्धेबाहेर गेलो, असे चेल्सीचा गोलरक्षक कॉर्टियस याने सांगितले. 

चॅंपियन्स 
लीगमधील मेस्सीचे गोलांचे शतक 
मेस्सीने २.०८ मिनिटांतच गोल केला. हा त्याचा कारकिर्दीतील सर्वात वेगवान गोल. 
चॅंपियन्स लीगमध्ये इंग्लिश क्‍लबविरुद्ध दहा लढतीत गोल करू शकला नव्हता; पण त्यानंतर सलग १८ लढतीत गोल. 

बायर्नचा बहर कायम 
इस्तंबूल - बायर्न म्युनिकने तुर्कीच्या बेसिक्तासविरुद्ध दुसऱ्या टप्प्यात ३-१ बाजी मारत विजयाची औपचारिकता ८-१ अशी पूर्ण केली. बायर्नचे मार्गदर्शक जुपप हेनिक्‍स यांचा या स्पर्धेत हा सलग ११वा विजय. ते २०१३ च्या विजेतेपदानंतर निवृत्त झाले होते; पण या मोसमात त्यांनी पुनरागमन केले.

बहारदार बार्सिलोना 
सलग अकराव्यांदा चॅंपियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत 
इंग्लिश क्‍लबविरुद्ध बार्सिलोनाचा हा 
२३ वा विजय, अन्य क्‍लबपेक्षा सर्वाधिक 
चेल्सीविरुद्धच्या पहिल्या दोनही शॉटवर गोल 
प्रतिस्पर्ध्यातली ही १४ वी लढत, चॅंपियन्स लीग इतिहासातील ही दोन क्‍लबमध्ये झालेल्या सामन्यातील सर्वाधिक तिसरी लढत. बायर्न-रेयाल माद्रिद (१८) आघाडीवर 
चॅंपियन्स लीग लढतीत घरच्या मैदानावर 
बार्सिलोनाचा हा २६ विजय (४० लढतीत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com