फुटबॉल टर्फ वाचवण्यासाठी वन-डे ठिकाणात बदल

वृत्तसंस्था
Friday, 23 March 2018

तिरुअनंतपुरम : विश्‍वकरंडक सतरा वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने तयार झालेले मैदान उखडून त्याऐवजी भारत-वेस्ट इंडीज लढतीची खेळपट्टी तयार करण्याची केरळ क्रिकेट संघटनेची योजना बारगळणार आहे. त्यांनी भारत-विंडीज लढत कोचीऐवजी तिरुअनंतपुरम येथे खेळवण्यास तत्त्वतः मंजुरी दिली आहे. केरळ क्रिकेट संघटनेने भारत-विंडीज लढत कोचीच्या नेहरू स्टेडियमवर घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे जागतिक दर्जाच्या टर्फला धक्का बसणार होता.

तिरुअनंतपुरम : विश्‍वकरंडक सतरा वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने तयार झालेले मैदान उखडून त्याऐवजी भारत-वेस्ट इंडीज लढतीची खेळपट्टी तयार करण्याची केरळ क्रिकेट संघटनेची योजना बारगळणार आहे. त्यांनी भारत-विंडीज लढत कोचीऐवजी तिरुअनंतपुरम येथे खेळवण्यास तत्त्वतः मंजुरी दिली आहे. केरळ क्रिकेट संघटनेने भारत-विंडीज लढत कोचीच्या नेहरू स्टेडियमवर घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे जागतिक दर्जाच्या टर्फला धक्का बसणार होता. ही लढत अन्यत्र खेळवण्याची विनंती केरळा ब्लास्टर्सचा सहमालक सचिन तेंडुलकर, ॲटलेटिको डे कोलकताचा सहमालक सौरभ गांगुली, भारतीय फुटबॉल कर्णधार सुनील छेत्री, शशी थरूर यांच्यासह अनेकांनी केली होती. अखेर केरळचे क्रीडामंत्री ए. सी. मोईदीन यांनी यात लक्ष घालून केंद्र बदलण्याचा निर्णय घेतला. वन-डेबाबतचा अंतिम निर्णय केरळ क्रिकेट संघटनेच्या वार्षिक सभेत घेण्यात येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news Thiruvananthapuram save the football turf